जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर येथे झाली बदली.- कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती.
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली झाली असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळलेल्या किशोर तावडे यांची बदली झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किशोर तावडे यांनी यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे त्यांना आता जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची बदली कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे
