चक्रीवादळग्रस्तांची रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उदया देणार भेट..- पहा तर मुख्यमंत्र्यांचाा दौरा
मुंबई . प्ररतिनिधी. २०:-
तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवार २१ मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे
सकाळी ८.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
०८.४० वा. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण
सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण येथे आगमन व “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. या पहाणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण