कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत – ‘इतक्या’ डॉक्टरांचा मृत्यू
नवी दिल्ली –वृतसंस्था.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात 329 डॉक्टर मृत्युमुखी पडले. त्यामध्ये बिहारमधील सर्वांधिक 80 डॉक्टरचा समावेश आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) गुरुवारी दिली.
बिहारपाठोपाठ दिल्लीत 73, तर उत्तर प्रदेशात 41 डॉक्टरांचे कोरोना संसर्गाने निधन झाले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभरात 748 डॉक्टर दगावले. देशभरातील आपल्या शाखांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयएमने संबंधित आकडेवारी जारी केली.
👉निधन झालेल्या डॉक्टरांपैकी किती जणांचे करोना लसीकरण पूर्ण झाले होते त्याविषयीचा तपशील उपलब्ध नसल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले.त्याचवेळी, पूर्ण लसीकरण न होणे हे डॉक्टरांच्या मृत्यूमागील प्रमुख कारण असल्याचेही आयएमएने सूचित केले. आयएमए ही डॉक्टरांची देशातील प्रमुख संघटना मानली जाते.