आजरा किटवडे ए.टी. वेळापत्रकात मनमानी कारभार.- त्रासलेले विद्यार्थी व प्रवासी यांनी मनसेला दिली हाक.( आजरा मनसे – विद्यार्थी सेनेचे एसटी आगार व्यवस्थापनाला निवेदन. )
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील गावे डोंगराळ असून संध्याकाळी ४ वाजले पासून ७ वाजे पर्यंत एसटीची वाट पाहावी लागते. ही एसटी रात्री ८.३० ला गावी पोहचते यामध्ये विद्यार्थी व महिला वर्गाचे फार हाल होतात त्यामुळं कोणतीही सबब न देता वेळापत्रकानुसार ही बस ५:३० ला सुटलीच पाहिजे अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करू असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष सुधिर सुपल यांनी आगाराला दिला त्याच बरोबर सावंतवाडी डेपो च्या गाड्या या मार्गाला थांबत नाहीत असच चालत राहील तर त्या डेपोच्या गाड्यांना आजऱ्याच्या रस्त्यावर फिरू देणार नाही. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसे ता. उपाध्यक्ष आनंदा घंटे, मनविसे जी.उपाध्यक्ष आश्विन राणे, मनविसे तालुका अध्यक्ष वैष्णव दळवी, मनविसे ता. संघटक विष्णू चौगुले, सरिता सावंत महीला ता. अध्यक्ष, पार्थ पाटील, तन्मय राणे,पांडुरंग पाटील, कार्तिक राणे, पृथ्वी कांबळे, विशाल पाटील, सुमित पाटील, अक्षय पाटील, जयदीप डेलेकर, शुभम राणे कुणाल ससाणे, शुभम पाटील विनायक कांबळे, प्रेम वडर, साहिल कांबळे, वैभव जाधव जीवन डेळेकर,गोविंद पाटील, राजेंद्र यादव, शुभम परीट, साहिल केरकर, स्वप्नील कुंभार, श्रावण राणे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
