आज-यात सोमवारी मणिपूर निषेध मोर्चा शांततेत काढण्याचा निर्धार.- राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व विविध पुरोगामी संघटना.
आजरा :- प्रतिनिधी.
महात्मा गांधी,जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती,शिवाजी महाराज, संभाजी महाराज,साईबाबा यांच्याबद्दल अपशब्द उद्गार काढल्याबद्दल व मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढल्याच्या निषेधार्थ आजरा येथे सोमवार दि २१ आँगष्ट रोजी निषेध मोर्चा व सहवेदना मार्च शांततेत काढण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्या जनता बँकेतील आढावा बैठकीत घेण्यात आला.अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष मुकुंदराव देसाई होते. यावेळी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा म्हणाले,सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.भविष्यात देशाचे भवितव्य धोक्यात आहे.घटना संवेदनशील असल्याने महिलांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याची गरज आहे.रँलीने अजून माणूसकी जिवंत असल्याचे दाखवून देऊया असे सतिश कांबळे म्हणाले, प्रत्येक कुटुंबाला या प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्याची गरज आहे.प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले,गांधींच्या शांततापूर्ण आंदोलनाप्रमाणे रँली काढली जावावी.इनास फर्नांडीस म्हणाले, मणिपूरचा विषय सर्वसामान्य नागरिकांना समजलेला नाही. त्यांना याबाबत माहिती देऊन झुंडशाही विरोधात उभे राहण्याची गरज आहे. यावेळी झालेल्या चर्चेत संजय घाटगे, प्रा.डॉ.नवनाथ शिंदे,प्रकाश मोरस्कर,गिता पोतदार आदींनी सहभाग घेतला. यावेळी सर्वसमावेशक रँली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी जयवंतराव शिंपी, रणजीत देसाई, प्रा.मिना मंगळूरकर, युवराज पोवार ,अंतोन बारदेस्कर, कृष्णा सावंत,पुष्पलता घोळसे, मुनीर माणगावकर, हाफिज मुरा, सुरेश कालेकर, डि के कांबळे, मायकेल बारदेस्कर, मिनीन परेरा, बाळू जाधव आदी उपस्थित होते. काँ.संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. काँ.संजय घाटगे यांनी आभार मानले.
