HomeUncategorizedमुदाळतिट्टा येथे उड्डाणपुल बांधणेसाठी निधी मंजूर करा : आमदार प्रकाश आबिटकरमुख्यमंत्री एकनाथ...

मुदाळतिट्टा येथे उड्डाणपुल बांधणेसाठी निधी मंजूर करा : आमदार प्रकाश आबिटकरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी

मुदाळतिट्टा येथे उड्डाणपुल बांधणेसाठी निधी मंजूर करा : आमदार प्रकाश आबिटकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी

गारगोटी प्रतिनिधी,


कोल्हापूर जिल्हयातील गारगोटी-कोल्हापूर व राधानगरी- निपाणी या राज्यमार्गावरील मुदाळ तिटटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरीकांचे हात होत असून मुदाळतिट्टा येथे उड्डाणपुल बांधणेसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मुदाळतिट्टा हे राधानगरी, भुदरगड व कागल या तिन्ही तालुक्यांच मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. या ठिकाणापासून १ किमी अंतरावर आदमापूर हे सदगुरु बाळूमामा यांचे देवस्थान असून दोन राज्यमार्गांचे मध्यभागी हे ठिकाण आहे. या बरोबरच मोठी व्यापरपेठ, सहकारी साखर कारखाना, शैक्षणिक संस्था याच परिसरामध्ये असल्यामुळे सदर ठिकाणी नियमित वाहनांची वर्दळ असते. सदगुरु बाळूमामा मंदीर येथे दर रविवारी मोठ्या प्रमाणात भावीक येत असून आमवस्याला यात्रा भरते. या यात्रेत राज्यासह परराज्यातून भक्तगण येत असतात. तसेच पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन येणारी अवजड वहाने निपाणी-मुदाळ तिटटा-राधानगरी मार्गे कोकणात जातात त्यामुळे मोटी अवजड वाहने येथे दैनंदिन येत असतात. गारगोटी-कोल्हापूर हा अत्यंत रहदारी असणारा मार्ग असल्यामुळे मोठया प्रमाणात दळण-वळण या मार्गे सुरु असते. परिणामी येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन २ ते ३ तासांची व यात्रेवेळी ५ ते ६ तासांपर्यंत वाहतूक कोंडी होत असते यामुळे प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत असून अत्यावश्यक प्रसंगी एखादी रुग्णवाहीका देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत. तसेच भविष्यात कोल्हापूर-गारगोटी मार्गे गोव्याकडे जाण्यासाठी मार्ग होणार असून मोठ्या प्रमाणात वाहने वाढणार आहेत. यामुळे मुदाळतिट्टा येथे उड्डानपुल होणेची मागणी येथील नागरीकांकडून होत असून याठिकाणी उड्डाणपूल बांधणेसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.