HomeUncategorizedगडहिंग्लज लक्ष्मी मंदिरात होणार डी. एड. बी. एड धारक भावी शिक्षकांचा मेळावा.

गडहिंग्लज लक्ष्मी मंदिरात होणार डी. एड. बी. एड धारक भावी शिक्षकांचा मेळावा.

गडहिंग्लज लक्ष्मी मंदिरात होणार डी. एड. बी. एड धारक भावी शिक्षकांचा मेळावा.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

आजरा येथे पालक शिक्षक बेरोजगार डी. एड, बी.एड धारक संघटना.
गडहिंग्लज येथे रविवार दि.२० ऑगस्ट रोजी डी.एड, बी.एड धारक शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणारे सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक व पालक यांचा मेळावा आयोजित केला. असल्याचे प्रसिद्धीपत्रक कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शिक्षक भरती होणार होणार असे म्हणत बारा वर्षे गेली २०२३ च्या जून महिन्यात शिक्षक भरती होणार म्हणत असतानाच अर्धा ऑगस्ट महिना झाला तरीही शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत सुरु करण्यास विलंब होत आहे. .शिक्षकांच्या ५०००० पेक्षाही जास्त रिक्त पदामुळे शालेय विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे, राज्यात लाखो बेरोजगार डी.एड, बी.एड. पदवीधर तरुण शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. मात्र असे असतानाही याकडे लक्ष न देता सेवानिवृत्त शिक्षकांना २०००० मानधनावर घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याच्या निर्णयाला विरोध करणे, शिक्षक भरती तात्काळ करावी, सरकारी, निमसरकारी, खाजगी अनुदानित शिक्षण संस्थामधील शिक्षक भरती पवित्र या पोर्टल मार्फतच करावी या व इतर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी रविवार दि २० ऑगस्ट रोजी गडहिंग्लज येथील लक्ष्मी मंदिरात हा मेळावा होणार आहे तरी सर्व डी.एड., बी.एड धारकांनी व त्यांना पाठिंबा देणाऱ्या शिक्षक संघटना प्रतिनिधींनी व पालक यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.