Homeकोंकण - ठाणेपाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा मागीलमास्टरमाईंड कोण सुरक्षारक्षकांना देशविरोधी घोषणा देण्यासाठी चिथावणी देणारे कोण...

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा मागीलमास्टरमाईंड कोण सुरक्षारक्षकांना देशविरोधी घोषणा देण्यासाठी चिथावणी देणारे कोण ? – मनसे नेते जयराज लांडगे यांचा पुणे पोलिसांना सवाल

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा मागील
मास्टरमाईंड कोण सुरक्षारक्षकांना देशविरोधी घोषणा देण्यासाठी चिथावणी देणारे कोण ? – मनसे नेते जयराज लांडगे यांचा पुणे पोलिसांना सवाल

पुणे :- प्रतिनिधी.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोंढव्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोन जणांनी या घोषणा दिल्याचे समोर आले आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे. हे प्रकरण यावर थांबवू नका. अशा घोषणा देण्यासाठी त्यांना कोणी चिथावणी दिली. त्या फूस लावण्यामागे कुणाचा हात आहे. याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस, पुणे उपशहराचे अध्यक्ष जयराज लांडगे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
जयराज लांडगे म्हणाले, कोंढव्यातील एका ठिकाणी बांधकाम सुरू आहे. तेथे काम करणारे दोन सुरक्षारक्षक सोमवारी रात्री पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असल्याचे समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पण हे प्रकरण सहज, हलक्यावारी घेऊ नये. यापूर्वी कोंढवा भागातून अनेकदा दहशतवाद विरोधी पथक, केंद्रीय तपास यंत्रणेने आयसिससह अन्य देशविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्या अटक केली करण्यात आली आहे. हे दहशतवादी देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचेही उघडकीस आली होते. त्यामुळे पुणे शहराची शांतता-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम कोण करत आहे. सुरक्षारक्षकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्याचे काहीच काम नाही. तरीही त्यांनी अशा घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे या घोषणा मागील मास्टरमाईंड शोधण्याची गरज आहे. पोलिसांनी देशविरोधी कारवायांची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणीही जयराज लाडंगे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.