HomeUncategorizedवंचित घटकाला वीजेचा 'प्रकाश' मिळाल्याचे समाधान.- आम. प्रकाश अबिटकर,( पेरणोली-हरपवडे धनगरवाड्यात ७५...

वंचित घटकाला वीजेचा ‘प्रकाश’ मिळाल्याचे समाधान.- आम. प्रकाश अबिटकर,( पेरणोली-हरपवडे धनगरवाड्यात ७५ वर्षानंतर वीज पोहचली.)

वंचित घटकाला वीजेचा ‘प्रकाश’ मिळाल्याचे समाधान.- आम. प्रकाश अबिटकर,
( पेरणोली-हरपवडे धनगरवाड्यात ७५ वर्षानंतर वीज पोहचली.)

आजरा:- प्रतिनिधी.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर हरपवडे व पेरणोली धनगरवाड्याला विजपूरवठा करून वंचित घटकाला प्रकाश देता आला असल्याचे समाधान आम. प्रकाश अबिटकर यांनी व्यक्त केले. आजरा तालूक्यातील पेरणोली-हरपवडे धनगरवाड्याला अथक प्रयत्नानंतर ७५ वर्षानंतर शुभारंभ करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अबिटकर म्हणाले, महावितरणच्या गडहिंग्लज विभागातील व आजरा तालुक्यातील हरपवडे व पेरणोली गावाशी संलग्न धनगरवाडा स्वातंत्र्यदिनी ७५ वर्षानंतर प्रकाशमान होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून महावितरणने ही कामगिरी केली आहे.दळवणापासून वंचित, अत्यंत दुर्गम व वनविभागाच्या क्षेत्रातील हा धनगरवाडा प्रकाशमान करण्यासाठी महावितरण यंत्रणेने अथक परिश्रम घेतले आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून हा धनगरवाडा प्रकाशमान करण्यासाठी ६३ केवीए क्षमतेच्या वितरण रोहित्र पोहचविण्याचे कठीण काम करण्यात आले आहे. चिखल वाट तूडवीत हाताने खेचून वितरण रोहित्र पोचविण्याचे कठीण कार्य महावितरणच्या जनमित्रांसह कंट्रातदारांच्या कर्मचाऱ्यांनी केले त्याबद्दल अबिटकर यांनी वीज कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. याप्रसंगी आजरा कारखाना संचालक राजेंद्र सावंत,कल्याणराव निकम,अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, गडीहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार अडके यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा उपविभागीय अभियंता सुहास मिसळ, शाखा अभियंता शरद पाटील, ठेकेदार नितीन पेडणेकर, संदीप तेजाम,देवदास गुरव, गोविंद गुरव,पांडुरंग धाटुंबे, नेताजी कातकर ,संतोष भाटले, रणजित सरदेसाई, इंद्रजित देसाई, काकासो देसाई, सुनील दिवेकर,वनविभागाचे बाळेश न्हावी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.