आजरा समृद्धी शेतकरी ग्राम उद्योजक नेपियर नर्सल- प्रशिक्षण.- सहल संपन्न. ( सिद्धनाथ लोकविकास प्रशिक्षण – मंगळवेढा. सुपर नेफेअर नर्सरी घोडेश्वर ( बेगमपूर) ता.. माहोळ जि. सोलापूर
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा समृद्धी प्रोडूसर कं लि. आजरा शेतकरी ग्राम उद्योजकांची सिद्धनाथ लोकविकास प्रशिक्षण – मंगळवेढा. सुपर नेफेअर नर्सरी घोडेश्वर ( बेगमपूर) तालूका. माहोळ जिल्हा. सोलापूर येथे दि.१३/८/२०२३ रोजी संपन्न झाली.
यावेळी सिद्धनाथ लोकविकास प्रतिष्ठान व नर्सरीचे प्रमुख भीमराव कोंडूभैरी यांनी नेपियर गवत हे कोणत्या पद्धतीने लागण करावी आपण केलेली पद्धत व उपजीविका कशी करावी याबाबतची माहिती सर्व शेतकरी ग्राम उद्योजकांना दिली.
यावेळी सदर नेपियर गवत हे किती उपयुक्त आहे. त्याचे फायदे व दुपत्या जनावरांसाठी दुग्ध व्यवसाय मध्ये वाढ करून खर्च कमी व उत्पन्न जास्ती देणारे हे नेपियर गवत असून आपल्या शेतामध्ये जनावरांसाठी प्रथम थोड्या प्रमाणात लागन करावी. व त्याची वाढ कोणत्या पद्धतीने आहे. पहावे इतर गवतापेक्षा सदर गवताची जात देशात अधिक उत्पन्न देणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले व गवत लावण्याची प्रशिक्षण देण्यात आले यावेळी आजरा समृद्धीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे, संचालक संभाजी जाधव, रामचंद्र मुरुकटे सह ग्राम उद्योजक शेतकरी अर्चना देसाई, शिला मुरकुटे, जयश्री कांबळे, सरिता कांबळे कल्लेश्वर संकपाळ, लक्ष्मण लाढ, शंकर कांडगळ, सोपान तानवडे, विष्णू जाधव, बाळू सावरकर, दयानंद मुरकुटे, महादेव पाटील, संजय हरेर सह अजरा समृद्धीचे सर्व ग्राम उद्योजक शेतकरी यांनी सहलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
