Homeकोंकण - ठाणेसात लाखाच्या इन्सुली दारू - चारचाकी टेम्पो वाहनासह 13 लाख 92 हजार...

सात लाखाच्या इन्सुली दारू – चारचाकी टेम्पो वाहनासह 13 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

सात लाखाच्या इन्सुली दारू – चारचाकी टेम्पो वाहनासह 13 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

बांदा – प्रतिनिधी.

राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या पथकाने गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर,खामदेव नाका,इन्सुली येथे अवैधरित्या परराज्यातील मध्याची वाहतूक करताना चारचाकी टेम्पो वाहनासह 13 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
डॉ.विजय सूर्यवंशी,आयुक्त सो. राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई,मा.सुनील चव्हाण संचालकसो. विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्नेहलता नरवणे अधीक्षक सो राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली आज दि.10 ऑगस्ट 2023 रोजी तपासणी नाका इन्सुली येथील अधिकारी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी करीत असतानाच पहाटे मिळालेल्या बातमीनुसार वाहन क्रमांक MH 07 – AJ – 2880 हे वाहन तपासणी कामी न थांबल्याने त्याचा पाठलाग करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर खामदेव नाका येथे सदरचे वाहन थांबून त्याची तपासणी केली असता चोरकप्प्यामध्ये कागदी फुट्याच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची दारूसाठा दिसून आल्याने सदरचे वाहन तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर आणून त्याची कसून तपासणी केली असता सदर वाहनांच्या मागील हौद्याच्या वरील बाजूस असलेल्या चोर कप्प्यामध्ये लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे विविध ब्रँडच्या एकूण 2100 सीलबंद बाटल्या दारूसाठा वाहन चालक इसमाच्या ताबे कब्जात बेकायदेशीर रित्या वाहतूक करीत असताना मिळून आला.सदर प्रकरणी वाहन चालक विजय रमाकांत माने राहणार शिरसोसवाडी नेरूर ता. कुडाळ यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गुन्ह्यामध्ये अ.रु. 6 लाख 42 हजार रुपये किमतीची दारू व 7 लाख 50 हजार किंमतीची चारचाकी वाहन असा एकूण 13 लाख 92 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई संजय मोहिते,निरीक्षक उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली,श्री.तानाजी पाटील व श्री.प्रदीप रास्कर,दुय्यम निरीक्षक श्री. गोपाळ राणे,स.दु.नि,श्री दीपक वायदंडे जवान व श्री रणजीत शिंदे जवान नि.वाहन चालक यांनी केली.तर सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली श्री.प्रदीप रास्कर हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.