गडहिंग्लज – हडलगेतील श्रीमती पार्वती केदारी पाटील. वय वर्ष १०५ अल्पशा आजाराने दुःखद निधन.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे येथील श्रीमती पार्वती केदारी पाटील वय वर्षे १०५ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै केदारी यमाजी पाटील व श्रीमती पार्वती पाटील यांच्या कुटुंबाचा गाडा फार मोठा होता. कै केदारी पाटील यांचे निधन झाल्यानंतर श्रीमती पार्वती पाटील यांनी पुढील संसारिक वाटचाल चांगल्या पद्धतीने सांभाळली होती.
त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन सुना चार मुली व १६ नातवंडे असा परिवार आहे. एक मुलगा व मुलगी मयत आहेत.
रक्षाविसर्जन शनि. दि. १२ रोजी. सकाळी. ९ वा.
