श्रेयवादासाठी आंबेओहळचे पाणी पूजन…- काँ. शिवाजी गुरव.
आजरा.- प्रतिनिधी.
श्रेयवादासाठी आंबेओहळचे ट्रिपल इंजन सरकारचे पाणी पूजन केली असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात काँ. शिवाजी गुरव म्हटले आहे. याबाबत धरणग्रस्तांची व्यथा प्रसिद्धी पत्रकात मानताना म्हटले आहे.
राज्य पातळीवर सत्तेत एकत्रच असणारे स्वतंत्र पाणी पूजनाचा कार्यक्रम घेऊन श्रेय घेत आहेत. मात्र ज्यांनी स्वतःची शेती धरणासाठी दिली परंतु अद्याप ज्या धरणग्रस्तानचे पुनर्वसन झालेली नाही. त्या शेतकऱ्याला मात्र वाली कोणीच राहिला नाही. ४० टक्के पुनर्वसन बाकी आहे. त्यामध्ये जवळपास २०० शेतकऱ्यांना जमीन मिळणे बाकी आहे.
बऱ्याच धरणग्रस्ताना जमिनी मिळालेल्या नाहीत, कांही धरणग्रस्त शेतकर्यांना जमीन मिळाली पण त्यांना भूखंड मिळाले नाहीत, भोगवट्याची रक्कम बाधित जमिनीचे कापून घेतली असताना पुन्हा मिळालेल्या जमिनीवर बोजे चढवले जात आहेत, आर्थिक प्याकेज मिळालेले नाही, कांही धरणग्रस्तांचे असे अनेक प्रश्न भिजत पडले आहेत.
असे असताना आंबेओहळचे पाणी पाहून हुरळून गेल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांचा कळवळा कोणत्या लोकप्रतिनिधीना का येत नाही? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र राजकारण करून पाणी पूजन कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यांनी पुनर्वसनासाठी प्रयत्न केला पाहिजे. धरणग्रस्त हा विकास सैनिक आहे त्यांच्या पुनर्वसनाकडे डोळेझाक करू नये अन्यथा धरणग्रस्त माफ करणार नाहीत. असे दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटना अध्यक्ष – कॉ. शिवाजी गुरव सह धरणग्रस्तांनी म्हटले आहे.
