HomeUncategorizedआजरा - सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत माजी ग्रामसेवकांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर.- विद्यमान सरपंच...

आजरा – सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत माजी ग्रामसेवकांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर.- विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्यांनी केली चौकशीची मागणी.(११ लाख रु.चा.गैरव्यवहार केला असल्याचा संशय.)

आजरा – सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत माजी ग्रामसेवकांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर.- विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्यांनी केली चौकशीची मागणी.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत मध्ये मागील ग्रामसेवक ने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत विद्यमान सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन सदर रक्कम ग्रामपंचायत मध्ये भरणा करावी व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की ग्रामपंचायत सुळेरान ता आजरा जि. कोल्हापूर कडे सन २०२० २०२० पासून ते आजपर्यंत ग्रामसेवक या पदावर एस. के. येळणे हे कार्यरत होते. नुकतीच सन २०२२/२३ मध्ये निवडणूक झाली यावेळी लोकनियुक्त सरपंच म्हणून राशिकांत बाळकू कांबळे) निवड झाली आहे. माहे डिसेंबर मध्ये ग्रापपंचायत कडील मासिक सभेवेळी ग्रामसेवक यांचेकडून दप्तर तपासणी केली असता त्यांनी सन २०२१/२२ व सन २०२२/२३ मधील केलेली कर वसुलीची ग्रा.पं खातेवर बँकेत भरणा केला असलेचे दिसून येत नाही. वसूल केलेली घरफाळा व पाणीपट्टी परस्पर खर्च केल्याचे दिसून येते. ग्रामनिधी व पाणीपुरवठा या खात्यांची बैंक पासबुके व कीर्द यांची तपासणी केली असता बैंक पासबुक वर खाडाखोड करूनन त्यामधील दाखवलेल्या खर्चात तफावत आढळते ग्रा. पं कडील १०%, १५% ३५ % खर्च मागील लेखापरीक्षण अहवालात खर्च केल्याचे दिसून येते पण प्रत्यक्षात खर्च केलेला नाही. तसेच सन २०२२/२३ मधील १५ वा वित्त आयोग मधील कामांचे एस्टिमेट झालेला खर्च व केलेली कामे यांचा ताळमेळ जुळुन येत नाही. ग्रामसेवक यांचेकडे या बाबींची विचारणा केली असता आम्हा सर्वांना सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य उडवाउडवीची उत्तरे देतात
माहे जानेवारी २०२३ ची गावसभा घेतली गावसभा चालू असताना ग्रामस्थांनी घरफाळा व पाणीपट्टीची वसुली विचारली काही ग्रामस्थांकडून अधिक पाणीपट्टी आकारल्याचे सिद्ध झाले प्रामस्थांना सर्व समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. ग्रामस्थांनी सर्वानुमते सांगितले कि ग्रामसेवक यांनी वसूल केलेला घरफाळा व पाणीपट्टी ग्रा प खातेवर भरणा करावी १५ वा वित्त आयोग मधील झालेल्या कामाची सर्व माहिती सागावी व स्वतः बदली करून जावे असे सभेतून सर्वानुमते ठरवण्यात आल त्यातच ग्रामसेवक यांनी सभा संपण्यापूर्वीच सभेतून पळ काढला व सभा बरखास्त झाली.
आम्ही सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी पंचायत समिती आजरा मा. गटविकास अधिकारी या कडे वरील सर्व समस्या बद्दल सांगितले व सर्वांच्या समक्ष तपासणी करण्याची मागणी केली पण आम्हाला त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही सद्याच्या संप काळात ग्रामसेवक यांनी वसुली करून सुद्धा पाणीपुरवठा वीजबिल भरणा न केल्यामुळे महावितरण विभागाने वीज खंडीत केली होती. त्यामुळे गावामध्ये ३ दिवस पाणी नव्हते अशी परिस्थिती असतानाही ग्रामसेवक यांनी कोणतीही दाखल घेतली नाही
वरील सर्व बाबींची पंचायत समिती आजरा कडे वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही योग्य न्याय मिळाला नाही. आपणास विनंती आहे कि, आपल्या विभागाकडून ग्रामपंचायत सुळेरान कडील ग्रामसेवक यांची व सर्व कारभाराची कसून तपासणी व चौकशी करून योग्य न्याय मिळावा अशा आशयाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा, व उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती आजरा यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर सरपंच शशिकांत कांबळे उपसरपंच जयश्री पाटील, मायकल बारदेस्कर, अनुष्का चौकुळकर सह ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.