Homeकोंकण - ठाणेसण - उत्सवाच्या काळात.- रेशनिंगवर रवा, मैदा, हरभरा डाळ मोफत द्या.- ...

सण – उत्सवाच्या काळात.- रेशनिंगवर रवा, मैदा, हरभरा डाळ मोफत द्या.- वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे जगणे मुश्किल.- मनसे नेते जयराज लांडगे यांची राज्य सरकारकडे मागणी

सण – उत्सवाच्या काळात.- रेशनिंगवर रवा, मैदा, हरभरा डाळ मोफत द्या. वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे जगणे मुश्किल.- मनसे नेते जयराज लांडगे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे : -प्रतिनिधी.

केंद्र सरकार महागाई आटोक्यात असल्याचे दावे करत आहे. मात्र, महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आगामी श्रावण महिना, गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्ठमी सारख्या सण आणि उत्सवाच्या काळात सर्वसामान्य लोकांना गोडधोड खाता यावे, यासाठी राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांवर गोरगरिबांसाठी रवा, मैदा, हरभरा डाळ आणि तेल मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस आणि पुणे उपशहराचे अध्यक्ष जयराज लांडगे यांनी केली आहे.
जयराज लांडगे म्हणाले, केंद्र सरकार देशात महागाई आटोक्यात असल्याचा दावा करीत आहे. प्रत्यक्षात खाद्यतेल वगळता कोणत्याही भुसारी मालाच्या दरात स्वस्ताई नाही. डाळी, अन्नधान्य, भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. या महागाईच्या दिवसात सर्वसामान्य लोकांना सण-उत्सव साजरे करून गोडधोड खाणे शक्य नाही. त्यामुळे राज्य सरकारने आगामी श्रावण महिना, गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्ठमी सारख्या सण-उत्सवाच्या काळात रेशनिंगवर रवा, मैदा, हरभरा डाळ आणि तेल उपलब्ध करून द्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.