Homeकोंकण - ठाणेहिरकणी गाड्या ज्यादा दराने प्रवाशांची लूट करत आहेत. - साध्या दराने तिकीट...

हिरकणी गाड्या ज्यादा दराने प्रवाशांची लूट करत आहेत. – साध्या दराने तिकीट दर आकारावा.- अन्यथा गाड्या मार्गावर फिरू देणार नाही.( आजरा मनसेचा निवेदनाने आजरा आगाराला इशारा.) – प्रवासी संघटनेने देखील दिला आंदोलनाचा इशारा

( सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र बातमी बातमी इफेक्ट)

हिरकणी गाड्या ज्यादा दराने प्रवाशांची लूट करत आहेत. – साध्या दराने तिकीट दर आकारावा.- अन्यथा गाड्या मार्गावर फिरू देणार नाही.
( आजरा मनसेचा निवेदनाने आजरा आगाराला इशारा.) – प्रवासी संघटनेने देखील दिला आंदोलनाचा इशारा

प्रवासी संघटनेने देखील दिला आंदोलनाचा इशारा

आजरा. प्रतिनिधी.

हिरकणी गाड्या ज्यादा दराने प्रवाशांची लूट करत आहेत. प्रवाशांना साध्या दराने तिकीट दर आकारावा अन्यथा गाड्या मार्गावर फिरू देणार नाही. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका यांच्या वतीने आजरा आगारास देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हिरकणी बस (एसटी) चालू केल्याबद्दल आपले प्रथम मनसे आजरा तालुका यांच्या वतीने अभिनंदन करत आहोत. आपण एकीकडे आपल्या आजरा आगारात बस कमी असल्याने नव्या बस उपलब्ध करून या चालू करून आजरा तालुक्यातील नागरिकांना सहकार्य करत आहात यामध्ये शंकाच नाही.
परंतु ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग यांना परवडणारी ही आपली बस सेवा आहे. त्यामुळे आपण एक तर सदर बस नेहमीच्या साध्या दरात चालू ठेवाव्या अन्यथा या बस आपण बंद कराव्या हिरकणी आरामदायी बसच्या नावावर प्रवाशाच्या यांच्या खिशाला कात्री लागत आहे. साध्या दरात प्रवाशांना सेवा द्यावी अशी आमची विनंती आहे. आजरा आगाराला नव्या पाच हिरकणी बस देण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून आज वासियांची मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. या नव्या बसच्या माध्यमातून आजरा तालुक्यातील नागरिकांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळाली आहे. या हिरकणी बस मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन
तरी आपल्या आजरा आगाराला विनंती आहे. आपण ज्यादा दराने हिरकणी सेमी लक्झरीच्या नावावर जो जादाचा तिकीट दर आकारत आहात तो साध्या गाडीप्रमाणे करावा यापेक्षा चांगल्या गाड्या साडेपोच्या असताना त्या साध्या दरात आहेत. तर आपल्या या गाडीचा दर अधिक कशासाठी व का? यासाठी आपण येणान्या चारपाच दिवसात योग्य तो निर्णय घेऊन संबंधित विभागाशी बोलून साध्या दरात बस सेवा नियमित करून प्रवाशांना आपल्या गाडीतून प्रवास करण्याची संधी द्यावी. अन्यथा आपल्या हिरकणी गाड्या ज्यादा दराने प्रवाशांची लूट करत आहेत, असे निदर्शनास आल्यास आपल्या गाड्या मार्गावर फिरू दिल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंटे, सचिव चंद्रकांत सामरेकर विद्यार्थी सेना वैष्णव दळवी सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

वाढीव दर पंधरा दिवसात कमी केले नाही तर एस. टी प्रवासी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन.

आजरा प्रतिनिधी.

हिरकणी एसटीचे वाढीव दर पंधरा दिवसात कमी केले नाही तर एस. टी प्रवासी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रवासी संघटनेने आजरा आगाराला निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा आगरासह जिल्ह्यातील अनेक भागात नव्याने एस.टी बस हिरकणी नावाने चालू झाले आहेत. नव्या सेवेत दाखल झाल्या याबाबत प्रवासी आनंदी आहे. त्यासाठी एस. टी महामंडळाने प्रवासी संघटना आभार मानत आहे, परंतु हिरकणी आरामदायी बस या नावाखाली ज्यादा तिकीट दर लावणे चुकीचे आहे. ग्रामीण भागातील लोकांना एसटी प्रवासाचा मोठा आधार आहे.
बड़े भांडवलदार स्वतःची गाडी चार चाकी वापरतात मात्र गोरगरिबांची गावी म्हणजे एस टी बस आहे. प्रवाशांना बहुतेक वेळा बंद पाटी आयएसटी बसमधून धोकादायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांन सुस्थितीतील एस.टी बस मिळणे आवश्यक आहे. नव्या एस.टी बस मधील तिकिटाचे दर ज्यादा प्रवाशांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नव्या गाड्यांचे दर सुद्धा साध्या गाडीच्या दराने आकारणी करावी. ज्यादा दर आकारणी करू नये. वाढीव दर पंधरा दिवसात कमी केले नाही तर एस. टी प्रवासी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन कैसे जाईल याची कृपया नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर काँ. शिवाजी गुरव, शांताराम पाटील कृष्णा सावंत, संजय घाटगे, सात्ताप्पा जाधव, शिवाजी इंगळे, काशिनाथ मोरे, सचिन लोहार, जयवंत तोरस्कर, सदू शिमणे, नेताजी साठे, विशाल गुरव यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.