Homeकोंकण - ठाणेभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर :...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी प्रतिनिधी,
राधानगरी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण व नागरी वस्तीचा विकास करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राधानगरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या दलित वस्ती मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी या योजनेत निधी मिळावा याबाबत मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मतदारसंघातील कामासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील विविध गावांतील असलेल्या दलित वस्ती मधील पायाभूत सुविधा उभारता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले आहे.

यामध्ये राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर 20 लाख, ओलवण पैकी बौध्दवाडी 15 लाख, कारीवडे पैकी डीगस 15 लाख, चंद्रे, 40 लाख, ठिकपुर्ली 20 लाख, राशिवडे बुद्रुक 20 लाख, सावर्डे पाटणकर 20 लाख, ऐनी 20 लाख, सावर्दे 20 लाख, आडोली 20 लाख, राशिवडे खुर्द 10 लाख आदी गांवाचा समावेश आहे.

भुदरगड तालुक्यातील शिवडाव 10 लाख, शेळोली 10 लाख, नितवडे 10 लाख, वासनोली 10 लाख, निष्णप 15 लाख, दिंडेवाडी 20 लाख, लोटेवाडी 15 लाख, तांब्याचीवाडी 15 लाख, आडे 10 लाख, देऊळवाडी 20 लाख, पिंपळगाव 20 लाख, बामणे 15 लाख, पांगीरे 15 लाख, नागणवाडी 10 लाख, कोळपण 10 लाख आदी कामांचा समावेश आहे.

आजरा तालुक्यातील एरंडोल 15 लाख, साळगांव 15 लाख, सुळेरान 15 लाख, खेडे 15 लाख, शेळप 15 लाख आदी गावांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.