Homeकोंकण - ठाणेमहाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक ओपिनियन पोल समोर- कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?...

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक ओपिनियन पोल समोर- कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा ओपिनियन पोल पहा.👇👇

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक ओपिनियन पोल समोर- कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा ओपिनियन पोल पहा.👇👇

मुंबई. – प्रतिनिधी.

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा ओपिनियन पोल समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीला लागले आहेत. तर, केंद्रातील भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ नावाच्या आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा ओपिनियन पोल समोर आला आहे. ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘सीएनएक्स’ने पोल हा केला आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपाला २० जागा मिळण्याची शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपानंतर सर्वाधिक ११ जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळू शकतील. काँग्रेसला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच इंडिया ला सर्वाधिक २४ जागा मिळतील असा हा सर्व्हे दर्शवतो आहे.

मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३२ टक्के, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १६ टक्के, काँग्रेस १६ टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १६ टक्के, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ टक्के, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के आणि अन्य पक्षांना ११ टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.या पोलनुसार भाजपाच्या ३ जागा कमी होणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेनेला फक्त २ जागा मिळणार असून १० जागांचा फटका बसणार आहे. अजित पवारांना २ जागांचा फायदा, तर काँग्रेसच्या ८ जागा वाढणार आहेत. उद्धव ठाकरेंना ६ जागांचा फायदा, तर शरद पवारांच्या ४ ही जागा तशाच राहणार आहेत.

विभागानिहाय कोणाला किती जागा मिळणार?

उत्तर महाराष्ट्र ६ जागा
एनडीए – ३
इंडिया – ३

विदर्भ १० जागा.
एनडीए – ५
इंडिया – ५

मराठवाडा ८ जागा.
एनडीए – २
इंडिया – ६

मुंबई ६ जागा.
एनडीए – ४
इंडिया – २

ठाणे आणि कोकण ७ जागा.
एनडीए – ५
इंडिया – २

पश्चिम महाराष्ट्र ११ जागा
एनडीए – ५
इंडिया – ६

【 या सर्व ओपिनियन पोल बाबत सर्वसामान्य मतदारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. सोशल मीडियाच्या एखाद्या पोस्टवर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ७० टक्के पेक्षा अधिक पसंती उद्धव ठाकरे यांना असताना या सर्वे मध्ये एनडीएला महत्त्व का दिली आहे. वैयक्तिक ठाकरे यांना पसंती अधिक असताना या सर्वे मध्ये त्यांची पसंती कमी दाखवली जाते. यासाठी ओपिनियन पोल सर्वे करत असताना सोशल मीडियावरील प्रतिक्रिया व ग्रामीण भागातील जनतेचे मत घेणे गरजेचे आहे असे बोलले जात. तसे पाहायला गेले तर एनडीए मध्ये मुळात महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अन्य पक्षाचेच नेते प्रवेश करून घेतल्याने कदाचित हा सर्वे अन्य नेत्यांवर डिपेंड आहे. त्या मतदारसंघातील मतदारांनी सदरनेत्याबरोबर मतदार म्हणून राहणे हा अंदाज चुकीचा ठरू शकतो 】

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.