Homeकोंकण - ठाणेआपले सरकार पोर्टल प्रमाणे बांधकाम विभागाचे ऑनलाईन पोर्टल सुरू करा – आमदार...

आपले सरकार पोर्टल प्रमाणे बांधकाम विभागाचे ऑनलाईन पोर्टल सुरू करा – आमदार प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत मागणी

आपले सरकार पोर्टल प्रमाणे बांधकाम विभागाचे ऑनलाईन पोर्टल सुरू करा – आमदार प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी,
राज्यात दरवर्षी कोट्यावधी रुपयांच्या रस्त्यांची कामे होत असतात. या रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत सर्वसामान्य नागरीकांमार्फत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांच्यामध्ये असणाऱ्या लागेबंधामध्ये या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असून सर्वसामान्य नागरीकांना रस्त्यांबाबत तक्रारी देणेकरीता महसूल विभागाच्या आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलप्रमाणे सार्वजनिक बांधकामाचे देखील ऑनलाईन पोर्टल सुरू करा अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोउत्तोराच्या दरम्यान केली.

प्रश्न मांडताना आमदार आबिटकर म्हणाले की, राज्य शासनामार्फत राज्यात दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चुन नवीन रस्ते केले जातात. या रस्त्यांच्या दर्जाकडे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असतात. यामुळे कोट्यावधी रुपये खुर्चन देखील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था होत आहे. या सर्व चुकीच्या प्रकाराला चाप लावण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना थेट शासनाकडे तक्रार करण्यासाठी महसूल विभागाच्या आपले सरकार या ऑनलाईन पोर्टल प्रमाणे बांधकाम विभागाचे देखील ऑनालाईन तक्रार पोर्टल तयार करणे गरजेचे आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीक रस्त्यांविषयी तक्रारी ऑनलाईन पध्दतीने करतील व यामाध्यमातून राज्यातील खराब रस्त्यांची दुरूस्ती होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

राज्यात रस्ते अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. या अपघातामध्ये अनेक नागरीक आपला जीव अथवा अवयव गमावत असतात. ज्यापध्दतीने वनविभागामार्फत वन्यप्राण्यांच्या हल्यामध्ये व महावितरण विभागामार्फत देखील शॉक लागल्यानंतर जखमी अथवा मयत झालेनंतर नागरीकांना नुकसान भरपाई देण्यात येते त्याचप्रमाणे रस्ते अपघातामध्ये मयत अथवा जखमी झालेल्या नागरीकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी देखील मागणी या प्रश्ना दरम्यान आमदार आबिटकर यांनी केली.

यावेळी उत्तर देताना बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागामार्फत आपले सरकार प्रमाणे बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल सुरू करण्याचे काम सुरू आहे असून लवकरच हे पोर्टल अद्यावतपणे सुरू करणार आहे. तसेच रस्ते अपघातामध्ये जखमी अथवा मृत झालेल्या झालेल्या नागरीकांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.