Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजे काढतात दुधाची धार, त्यांनाच मताचा अधिकार.जिल्हाव्यापी चळवळ उभी करण्याचा दूध उत्पादकांचा...

जे काढतात दुधाची धार, त्यांनाच मताचा अधिकार.जिल्हाव्यापी चळवळ उभी करण्याचा दूध उत्पादकांचा निर्धार.

जे काढतात दुधाची धार, त्यांनाच मताचा अधिकार.
जिल्हाव्यापी चळवळ उभी करण्याचा दूध उत्पादकांचा निर्धार
.

आजरा – प्रतिनिधी.

गोकुळच्या दूध उत्पादकांना मताचा अधिकार मिळण्या बरोबरच गोकुळच्या विकासाची भूमिका घेऊन जिल्हाव्यापी चळवळ उभी करण्याचा निर्धार आजरा येथे झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला मेळाव्याचे अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई होते.
सुरुवातीला कॉ संजय तरडेकर यांनी मेळाव्या मागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की गोकुळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीमध्ये दूध उत्पादकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित केला आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांनी मांडणी करताना सांगितले की ही लढाई एकाच वेळी प्रशासन आणि शासनासोबत ही करावी लागणार आहे गोकुळच्या विकासाबद्दल आणि दूध उत्पादकांच्या न्यायासाठी प्रशासनासोबत तर उत्पादकांना मताचा थेट अधिकार मिळावा यासाठी सरकारसोबत संघर्ष करावा लागणार आहे. हा संघर्ष सगळे मिळून नेटाने उभा करूया. आणि सरकारला निर्णय करायला भाग पाडुया.

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष युवराज पवार यांनी गोकुळ हा दूध उत्पादकांच्या जीवावरच उभा आहे त्यामुळे गोकुळच्या कारभारात उत्पादकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

भाकप माले पक्षाचे कॉम्रेड शांताराम पाटील यांनी भूमिका मांडताना हा संघ आमच्या घामावर उभा आहे घामाचे योग्य दाम उत्पादकांना मिळालेच पाहिजे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना कॉ देसाई म्हणाले की वरवर ही लढाई गोकुळची वाटत असली तरी सगळ्या सहकारी दूध उत्पादकांच्या बाबत धोरण बदलणारी लढाई आहे. जे काढतात दुधाची धार, त्यांनाच मताचा अधिकार हे आपल्या लढ्याचे स्लोगण असेल. यावेळी संजय देसाई व्हिडी जाधव श्री कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केली श्री सुरेश शिंगटे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले सूत्रसंचालन केले यावेळी संजय घाडगे नामदेव भगरे शिवाजी इंगळे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.