Homeकोंकण - ठाणेआजरा शहरातील गंगामाई वाचन मंदीर बांधकामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी...

आजरा शहरातील गंगामाई वाचन मंदीर बांधकामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर.- सरवडे येथील अपघातामध्ये मृत्यु झालेल्या पोवार कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख प्रमाणे 18 लाख विशेषबाब म्हणून अर्थसहाय्य मंजूर –

.- सरवडे येथील अपघातामध्ये मृत्यु झालेल्या पोवार कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख प्रमाणे 18 लाख विशेषबाब म्हणून अर्थसहाय्य मंजूर –

राधानगरी तालुक्यातील सरवाडे गावातील जयवंत पोवार हे आपल्या कुटुंबियांसह पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असता मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात जयवंत पोवार यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा, सासुबाई, म्हेवणे व जिपचालक यांचा जागीच मृत्यु झाला असून 2 मुलींवर कोल्हापूर येथे उपचार सुरू असून अपघातामध्ये मृत्यु झालेल्या नागरीकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेषबाब म्हणून आर्थिक मदत मिळावी याकरीता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्यास यश आले असून पोवार कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख या प्रमाणे 18 लाख रुपचये आर्थसहय्य मंजूर झाला असल्याची माहिती प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातील जयवंत पोवार हे दि.17/05/2023 रोजी सकाळी गावाहून मिरज मार्गे पंढरपूर येथे देव दर्शनासाठी जात होते. मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातामध्ये जयवंत पोवार, त्यांच्या पत्नी स्नेहल पोवार, मुलगा सोहम, सासुबाई कोमल, मेव्हणे लक्ष्मण शिंदे व जिपचालक उमेश शर्मा यांचा मृत्यु झाला. त्यांच्या 2 मुलींवर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. या अपघातामध्ये सरवडे गावासह संपुर्ण राधानगरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत होती. पोवार कुटुंबावर काळाने घाला घालून आई-वडील आणि भाऊ हिरावल्यानंतर त्या मुलींचा आधार हारपला आहे. यामुळे त्यांना संगोपनासाठी विशेषबाब म्हणून आर्थिक मदत मिळावी याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास अखेर यश आले असून पोवार कुटुंबियातील मयत 6 नागरीकांना प्रत्येक 3 लाख या प्रमाणे 18 लाख रुपये विशेषबाब म्हणून अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. याकामी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आजरा शहरातील गंगामाई वाचन मंदीर बांधकामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर.

इचलकरंजी संस्थानचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी वाचनाचीच आवड असणाऱ्या आपल्या पत्नीच्या नावे गंगामाई वाचन मंदीराची स्थापना केली होती. या वाचन मंदीरातून लोकशाहीर द.ना.गव्हाणकर यांच्या सारखे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारे साहित्यीक. मृत्युजंय, छावा, युगंधर अशा कादंबऱ्यातून संपुर्ण महाराष्ट्राला आपल्या लेखणीतून भूरळ घालणारे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांसारखे नामवंत साहित्यीक याच गंगामाई वाचन मंदीरात घडले. समाजिक, सांस्कृतिक व साहित्यीक चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या गंगामाई वाचन मंदीरास 131 वर्षांची परंपरा असून आजरा शहराचे वैचारीक व्यासपीठ म्हणून या वाचन मंदीराची ओळख आहे. या वाचन मंदीराची नवीन अद्यावत इमारत बांधण्यासाठी नगरविकास विभागामार्फत 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आजरा शहाराच्या सर्वांगीण विकासाकरीता शासन स्तरावर पाठपुरावा करून नगरविकास विभागाकडून आजरा शहरातील विविध विकास कामांकरीता नव्याने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरामध्ये अनेक विकास कामे पुर्ण झाली असून काही कामी प्रगतीपथावर आहेत. आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गंगामाई वाचन मंदीराचा नावलौकिक आहे. या वाचन मंदिराने वाचकांबरोबर साहित्यिकांनाही बळ दिले. त्यामुळे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही साहित्यकृती तयार झाली. त्याच पद्धतीचे अनेक साहित्यिक परिसरात घडले असून या वाचन मंदीराची नवीन इमारत बांधणेची मागणी गेली अनेक वर्षापासून आजरा वासीयांची होती. या मागणीस अनुसरून केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून नगरविकास विभाग यांचे दि.20 जुलै, 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार गंगामाई वाचन मंदीराची नवीन अद्यावत इमारत बांधणेसाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती त्यांनी दिले आहे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.