बेरोजगार डी.एड् , बी.एड् धारकांचे आजरा पंचायत समिती समोर आंदोलन..- विविध संघटनांचा आंदोलनास पाठींबा.
आजरा. – प्रतिनिधी.
शिक्षक भरती त्वरित करा सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा वीस हजार मानधनावर घेण्याचा निर्णय रद्द करा पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती सुरू करा…. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका. अशा विविध मागण्या शासनाकडे करण्यासाठी आजरा पंचायत समिती समोर दि. २१ जूलै; रोजी बेरोजगार डी.एड , बी.एड् व अभियोग्यता धारकांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ.शिवाजी गुरव यांनी केले.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन पं.सं.शिक्षण विभाग व गटविकास अधिकारी यांना दिले. राज्यात लाखो डी.एड्, बी.एड् टी.ई.टी,सी.ई.टी,अभियोग्यता अशा सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन बेरोजगार असताना सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.
आंदोलनाला ज्येष्ठ साहित्यिक- राजाभाऊ शिरगुप्पे, माझी सभापती- निवृत्ती कांबळे, व्यंकटराव हायस्कूलचे माजी प्राचार्य- शिवाजीराव गुरव, आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष- निलेश रेडेकर, कॉम्रेड संजय घाटगे, शिवाजी इंगळे, मनसेचे तालुका अध्यक्ष आनंदा घंटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिले. आजरा तालुक्यातील शिक्षकांची बरीच पदे रिक्त असून महाराष्ट्र राज्यात सरकारी शाळांची स्थिती रिक्त पदांमुळे दयनीय झाली आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागात शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक भरती त्वरित सुरू करुन बेरोजगार डी.एड्, बी.एड् धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठीशी असल्याचे आपल्या मनोगतात वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचा निर्णयालाही विरोध केला आहे.
आंदोलनामध्ये सहभागी डी.एड्, बी.एड् धारकांनी आपल्या भावना व्यक्त करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डी.एड् , बी.एड् धारकांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले असून मागण्यांवर तात्काळ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यासाठी लवकरच डी.एड्, बी.एड् धारकांचा विभागीय मेळावा घेण्याचे ठरले. आंदोलनामध्ये पुंडलीक नावळकर, शशिकांत पाटील, विशाल गुरव, रोहिता सावंत, रेश्मा पाटील, ए.डी.कांबळे, सुहास कोंडूसकर, स्नेहलता केसरकर,माधवी शेलार, मनिषा बिल्ले यांचेसह बेरोजगार डी.एड् ,बी.एड धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
