जनता एज्युकेशन संचलित.- चाफवडे हायस्कूल चाफवडे हायस्कूल स्थलांतरावर ग्रामस्थ संतप्त. – आंदोलनाचा पवित्रा घेणार – सरपंच धनाजी दळवी.
आजरा.- प्रतिनिधी.

चाफवडे तालुका आजरा येथील जनता एज्युकेशन संचलित चाफवडे हायस्कूल चाफवडे शेजारी असलेल्या जेऊर गावांमध्ये हायस्कूल स्थलांतर केले बाबत येथील सरपंच व ग्रामस्थ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सरपंच धनाजी दळवी माहिती देताना म्हणाले मागील ३० वर्षापासून चालू असलेले व विनाअनुदानित ते शंभर टक्के अनुदान मिळेपर्यंत सर्व पदरी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांनी सहकार्य करून जो प्रश्न जेऊर चितळे भागातील विद्यार्थ्याकरिता पुढे केला जात आहे. त्याच वाहतुकीच्या प्रश्नाला चा पुढे करत परिसरातील विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची मुले जर आजऱ्यात अन्य संस्थेसाठी येत असतील तर मुलांची संख्या वाढणार कशी याबाबत शिक्षणाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. ही बाब गांभीर्याने नाही घेतल्यास व्यापक आंदोलन उभे राहणार आहे. तसेच यापूर्वी वेळोवेळी सूचना करून देखील शाळा व्यवस्थापन समिती मध्ये स्थानिक ग्रामस्थांना घेऊन याबाबत येणाऱ्या अडचणी व चर्चा होणे आवश्यक होते. पण या समितीमध्ये ग्रामस्थांना घेतले नाही. व आजतागायत शाळेचे इतिहासात कधीही घडलेले नाही. पण आजरोजी कारण जे ऐकायला मिळतं आहे ते जागे अभावी शाळा जर जेऊर येथे ठिकाणी भरण्यात येत असेल. तर आम्हीच चाफवडे येथे देखील जागा उपलब्ध करून देऊ शकलो असतो. मागील अनेक वर्षापासून धरणासाठी व न्याय हक्कासाठी संघर्ष केला आता मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. शाळा स्थलांतरित चे प्रकार हे ग्रामस्थांना विश्वासात न घेता केलेली फसवणूक आहे. याबाबत आम्ही ग्रामस्थ नक्की उठाव करणार आहोत. असे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सरपंच श्री दळवी, माजी सरपंच सुरेश पाटील, तसेच बाळकृष्ण बापट, विजय भडांगे, संजय भडांगे, पांडुरंग ठकार निवृत्ती बांगर सह ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. श्री बापट यांनी आभार मानले.
