Homeकोंकण - ठाणेगोकुळने दुध उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. - दूध उत्पादकांनी लाभ...

गोकुळने दुध उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. – दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा. – संचालिका. श्रीमती रेडेकर

गोकुळने दुध उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. – दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा. – संचालिका. श्रीमती रेडेकर

आजरा. – प्रतिनिधी.

गोकुळ दुध संघाने दुध उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. जनावरे सुदृढ राहण्यासाठी संघाने पशुवैदयकीय सेवा पुरविली आहे. या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेऊन उत्पादकाने आपले दुध उत्पादन वाढवावे, असे आव्हान गोकुळच्या संचालिका श्रीमती. अंजनाताई रेडेकर यांनी केले. त्या घाटकरवाडी ता. आजरा येथील दुध उत्पादकांच्या मेळाव्यात आनंदराव पाटील चुयेकर म्हैस दुध वाढ व गुणवत्ता सुधार या कार्यक्रमा अंतर्गत गावातील सर्व संस्थांच्या उत्पादकांच्या सोबत झालेल्या बैठकीत बोलत होत्या.
प्रारंभी सहा. दुध संकलन अधिकारी महेश कोले यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात कार्यक्रमांचा हेतू स्पष्ट केला. व संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सर्व दुध संस्थांच्या वतीने श्रीमती रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्रीमती रेडेकर म्हणाल्या. गोकुळचे दुध हे उत्कृष्ट पध्दतीचे आहे. त्यामुळेच मुंबई व पुणे या दुधाला मोठी मागणी आहे. त्याचबरोबर गोकुळ इतर दुग्धजन्य पदार्थ यांची निर्मिती करते. यासाठी दुध कमी आहे. त्याकरिता दुध संघाच्या म्हैस दुध वाढ कार्यक्रम हाती घेतला आहे. गावोगावी जाऊन उत्पादकांचा मेळावा घेतला जात आहे. उत्पादकांना नविन संकरित जातीची जनावरे घेण्यासाठी आवाहन करित आहे. आपल्या गावातील दुध उत्पादकांनी संघानी राबविलेल्या या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा. व नविन संकरित जातीच्या म्हैशीची खरेदी करुन दुध उत्पादन वाढवावे. गुजरात, हरियाणा येथील संकरित जातीच्या म्हैशी खरेदी केल्यास दुध संघाच्या वतीने अनुदान हे दिले जाते. त्याचबरोबर वांज जनावरांना दुधामध्ये आणण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. वासरु संगोपन योजनेच्या माध्यमांतून आपल्याकडील संकरित जातीच्या वासरांसाठी अनुदान देण्याची योजना आहे. या सर्व योजनांच्या मधून दुध वाढीसाठी प्रयत्न केले जाते आहे. गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्ज योजनांचा लाभ घ्यावा व स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी.
यावेळी गाविंद पाटील यांनी आपल्या मनोगतातून या योजनेमध्ये गाव सक्रिय सहभाग घेईल असे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने दिले. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. सुनिल लोखंडे यांनी जनावरांच्या आरोग्या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला दुध संकलन उपविभागाचे उपव्यवस्थापक के. डी. आमते, दुध संकलन अधिकारी प्रकाश पाटील, सुपरवायझर उदय पाटील, किरण पाटील, विनायक पाटील यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व दुध उत्पादक मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.