हिंदुत्वाचे, मराठी माणसांचे कैवारी म्हणणारे हे सरकार बिल्डरांचे कि मराठी माणसांचे.- कॉम्रेड उदय भट.
( गिरणी कामगारांना मोफत घरे मिळालीच पाहिजे.- २० जुलै रोजी गिरणी कामगारांचा आजाद मैदानावर मोर्चा. आजऱ्यात मेळावा संपन्न. )
आजरा. – प्रतिनिधी.

हिंदुत्वाचे, मराठी माणसांचे कैवारी म्हणणारे हे सरकार बिल्डरांचे कि मराठी माणसांचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईत गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक लढ्यात सहभाग घेतला आहे. त्या गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घरे मिळाली पाहिजेत व २० जुलै रोजी होणाऱ्या आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. याबाबत आजरा येथील गिरणी कामगार, व वारसदार आयोजित मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून कॉम्रेड उदय भट बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक कॉम्रेड शांताराम पाटील यांनी केले पुढे बोलताना श्री भट म्हणाले गिरणी कामगारांना मोफत घरे मिळालीच पाहिजे यासाठी २० जुलै रोजी गिरणी कामगारांचा आजाद मैदानावर आंदोलन आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. कारण या सरकारला व नव्या राजकीय मंडळींची निवडणुकीच्या तोंडावर भाषा वेगळी असते तर नव्या चाललेल्या सरकारातील राजकीय मंडळींना जनावरे म्हणणे चुकीचे होईल कायदे बदलून गिरण्या विकल्या तेही बाहेरील राज्यातील बिल्डरांना ५१ खाजगी गिरण्या दिल्या. व ज्या मराठी माणसाने रक्ताचे पाणी करून अहोरात्र काम केलं त्यांना मुंबईचा सिंगापूर करायचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून सूडबुतीने राजकीय मंडळींनी गिरण्या बंद पडल्या. या मेळाव्यात गिरणी कामगारांना पेन्शन नाही. तर मतदान नाही असा निश्चय करण्यात आला येणाऱ्या काळात १५ ऑगस्ट २०२३ नंतर देशातील ७२१ जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे यावेळी उदय भट यांनी गिरणी कामगारांना संबोधित करताना म्हणाले.

यावेळी कॉम्रेड अतुल दिघे म्हणाले मुंबईत जागा नसल्याचे काही घुबड सांगत आहेत. एन सी टी च्या जागा दुसऱ्याला दिल्या मोदी सरकारला भीक लागली आहे का या सत्ताधारी सरकारला मतदान करायचं नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही अठराशे एकर जमीन देवेंद्र फडणीस यांनी विकली हे सरकार डाव करत आहे मुंबईत घरे द्यायला लागतात म्हणून यासाठी वर्षांनी सहभाग घेतला पाहिजे व सरकार तुमच्या हातात असल्याने ही घुबडे ओरडत आहेत. हा लढा आपल्याला लढायचा आहे यासाठी असाच मैदानावर उपस्थित राहायचं अहवाल श्री दिघे यांनी केले. चंदगड तालुका अध्यक्ष कॉम्रेड श्री गावडे यांनीही गिरणी कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉम्रेड नारायण भडांगे, शांताराम हरेर, नारायण राणे, आबा पाटील, निवृत्ती मिसाळ, गणपत ढोनुक्षे हिंदुराव कांबळे सह गावातील शाखाध्यक्ष, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉम्रेड संजय घाटगे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. भंडागे यांनी आभार मानले.

