साहेब आम्ही जगायचं कसं ? आजरा तालुका रेशन धान्य दुकानदार संघटना – आजरा. तहसीलदार यांना निवेदन.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील रेशन धान्य दुकानदारांच्या अनेक गंभीर प्रश्न्नान बाबत. आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की आजरा तालुका रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आपल्याला सदर विषयांवर सविस्तर विचार करून आम्हाला न्याय मिळावा कोरोना काळात आम्हाला शासनाकडून कोणतेही आरोग्य संरक्षण नसतानाही आम्ही २८ महिने मोफत रेशन धान्य १०० टक्के वाटप केले आहे. पण सदर धान्य वाटपाचे काही महिन्यांचे कमिशन आम्हाला मिळाले असून बाकी राहिलेल्या महिन्यांच्या कमिशन सह धान्य वाटप किलो व कमिशन रक्कम यांचा प्रत्येक दुकानदारांना परिपत्रकातून ताबडतोब लेखी हिशोब मिळावा.
२) काही रेशन दुकानदारांनी माहे डिसेंबर २०२२ ला चलनासाठी भरलेली लाखो रुपयांची रोख रक्कम संबंधित रेशन दुकानदारांना लवकरात लवकर परत मिळावी.
३) सेवा सोसायटी, बचत गट, तालुका संघ इत्यादी संस्थांच्या रेशन दुकान मध्ये काम करणाऱ्या सेल्समन ला कोरोना काळातील मोफत धान्य वाटपाचे कमिशन मिळणे बाबत संबंधित संस्थेचे पदाधिकारी व रेशन धान्य दुकानदार संघटने ची कमिटी यांना बोलावून आपण आपल्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करावी. शासन आदेशानुसार माहे डिसेंबर २०२२ पासून आज पर्यंत आम्ही आठ महिने पूर्ण झाले विकतचे रेशन धान्य मोफत वाटप करीत आहोत पण आठ महिन्यांपासून आम्हाला आज अखेर एक रुपया सुद्धा मिळालेला नाही.
म्हणूनच आपल्याला या पत्राद्वारे नम्र विनंती करत आहोत. वरील नमूद केलेल्या आमच्या सर्व विषयांवर शासन दरबारी आपण सविस्तर चर्चा करून ताबडतोब योग्य निर्णय घ्यावा सदर विषयांवर वेळेत तोडगा निघाला नाही तर आम्ही सोमवार दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी पासून आजरा तालुक्यातील सर्व धान्य वाटप बंद करून मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी आजरा तालुक्यातील ८७ रेशन धान्य दुकानदार काळ्या फिटी बांधून आपल्या तहसील कार्यालय समोरील शासकीय झेंडा वंदनासाठी सकाळी ठीक आठ वाजता हजर राहणार आहोत. या निवेदनावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, यांच्यासह सदस्य यांच्या सह्या आहेत.
