Homeकोंकण - ठाणेजपानमध्ये पावसाचं थैमान! - ३.७० लाख लोकांना घर सोडण्याचं आवाहन - २०...

जपानमध्ये पावसाचं थैमान! – ३.७० लाख लोकांना घर सोडण्याचं आवाहन – २० नद्यांना महापूर.

जपानमध्ये पावसाचं थैमान! – ३.७० लाख लोकांना घर सोडण्याचं आवाहन – २० नद्यांना महापूर.

नवीदिल्ली .- वृत्तसंस्था –

जपान देश सतत मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असतो. कधी त्सुनामी तर कधी चक्रीवादळ आपत्ती येणाऱ्या या देशामध्ये आता पावसाने थैमान घातलं आहे. शनिवारी जपानमधील शिमाने प्रांत आणि देशाच्या पश्चिम भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं.स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अवघ्या सहा तासांमध्ये शिमाने आणि इजुमो भागात १०९ मिमी पावसाची नोंद झाली. तर, शेजारीच असणाऱ्या मात्सु प्रांतात ९५.५ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे तेथील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

२० नद्यांना महापूर.

जपानमधील इजुमो शहरात अतिवृष्टीमुळे सुमारे १५ ठिकाणी भूस्खलन झाल्याचे दिसून आले. तर, या भागातील तब्बल २० नद्यांना महापूर आल्याची माहिती प्रशासनाने दिली. रविवारी देखील अशाच प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

लोकांना घर सोडण्याचे आदेश

स्थानिक प्रशासनाने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर इजुमो आणि शिमाने प्रांतातील सुमारे ३.७० लाख नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन केले आहे. घरातून बाहेर पडून, सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात (३ जुलै) देखील कुसुमोटो शहरातील ३.६० लाख नागरिकांना अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.