Homeकोंकण - ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! - अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, - महाराष्ट्रात...

राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! – अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, – महाराष्ट्रात आता दोन उपमुख्यमंत्री ( देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील.. )

राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! – अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, – महाराष्ट्रात आता दोन उपमुख्यमंत्री ( देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री. )

मुंबई;-(प्रतिनिधी )

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज सकाळी देवगीरी बंगल्यावर अजित पवारांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर संबंधित आमदारांच्या सहीचं पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर दाखल झाले. यानंतर काही वेळातच अजित पवारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतीली आहे.

मंत्रीमंडळात सामील झालेल्या नेत्यांची यादी

अजित पवार -उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील – मंत्री
सन मुश्रीफ – मंत्री
धनंजय मुंडे- मंत्री
धर्मारावबाबा आत्राम – मंत्री
आदिती तटकरे- मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री

खरं तर, अलीकडेच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.