Homeकोंकण - ठाणेडिजिटल मिडियाला राजमान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरु - ग्रामीण भागातील डिजिटल मीडियाच्या नेहमी...

डिजिटल मिडियाला राजमान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरु – ग्रामीण भागातील डिजिटल मीडियाच्या नेहमी पाठीशी – राज्याध्यक्ष – माध्यम तज्ञ – राजा माने.( आजरा – गडहिंग्लज – चंदगड डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने बैठक संपन्न. )

डिजिटल मिडियाला राजमान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरु – ग्रामीण भागातील डिजिटल मीडियाच्या नेहमी पाठीशी – राज्याध्यक्ष – माध्यम तज्ञ – राजा माने.
( आजरा – गडहिंग्लज – चंदगड डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने बैठक संपन्न. )

गडहिंग्लज. – प्रतिनिधी.

डिजिटल मिडिया पत्रकारिता क्षेत्रातील नव्या ऐतिहासिक पर्वाची मुहूर्तमेढ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ आस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेऊन रोवली! आहे. आता डिजिटल मिडियाला राजमान्यता मिळण्याची अधिकृत प्रक्रिया सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक, संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ राजा माने यांचा दौरा गडहिंग्लज येथे दि. १९ रोजी झाला. यावेळी आजरा – गडहिंग्लज – चंदगड मधील डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार यांच्यावतीने चर्चासत्र व राजा माने यांचे प्रमुख मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजा माने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ट पत्रकार सुभाष धुमे होते. स्वागत व प्रास्ताविक पत्रकार दीपक मांगले यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना माध्यम तज्ज्ञ श्री.माने म्हणाले धावपळच्या जीवनामधील व डिजिटल युगामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार त्याना वाढती प्रसिद्धी मिळत असताना शहरासह ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या पत्रकारांना व्यासपीठ व राजमान्यता मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न चालू आहेत. कोरोना काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व काय आहे. हे संपूर्ण देशाला समजले आहे. लवकरच डिजिटल मीडियाला मान्यता मिळावी या मागणीला सद्याचे सरकार मान्यता देईल याची खात्री आहे.
आपण ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांनी आपलं चालू असलेले पत्रकार क्षेत्रातील काम चांगल्या पद्धतीने करावे आपल्याला कमी समजणाऱ्या लोकांना मोठे होऊ द्या. आपण याकडे दुर्लक्ष करून आपली बातमीदारी कशा पद्धतीने उत्तम होईल इकडे लक्ष द्या. डिजिटल मीडियाला नक्कीच यश मिळणार आहे. व त्यासाठी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी मागणीचा पाठपुरावा चालू असल्याचे बोलताना श्री माने म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार श्री धुमे यांनी पूर्वीची पत्रकारिता व सद्याची पत्रकारिता त्यातील फरक आपले अनुभव सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. व डिजिटल मीडियाचे महत्त्व पटवून सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केले. यावेळी डिजिटल संघटनेचे जिल्हाध्यक्ष संपादक सुहास पाटील यांनीही संघटनेची पुढील वाटचाल व ग्रामीण पत्रकारांच्या आपण पाठीशी असल्याचे आश्वासन दिले तसेच ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना येत असलेल्या अडचणी काही पत्रकारांना समाजातील काही घटकांकडून व शासकीय स्तरावर मिळत असलेली दुय्यम वागणूक व अनुभव विविध मागण्या यावेळी आजरा गडहिंग्लज चंदगड येथील संपादक, पत्रकार यांनी मांडल्या त्यामध्ये चेतन शेरेगार, संभाजी जाधव, संतोष सुतार, श्री सावंत भोसले, नितीन मोरे, अमित कांबळे सह सर्व पत्रकारांनी आपल्या व्यथा व अनुभव व्यक्त केले.
सर्व पत्रकारांच्या वतीने राज्याचे अध्यक्ष राजा माने, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तीनही तालुक्यातील डिजिटल मीडियाचे सर्व संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संपादक संभाजी जाधव यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.