Homeकोंकण - ठाणेजागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त - वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी...

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त – वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकासाठी जनजागृतीपर कार्यक्रम..

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त – वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकासाठी जनजागृतीपर कार्यक्रम..

वेंगुर्ले :- प्रतिनिधी.

अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध दरवर्षी 26 जून हा दिवस अंमली पदार्थांच्या दुरुपयोगमुक्त जगासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने आज दिनांक १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एस.टी.स्टॅण्ड वेंगुर्ला येथे नागरिकांसाठी जनजागृती हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तर उदया मंगळवारी दि.२० जुन दुपारी १२ ते १ वाजता खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम व बीडीडीएस पथकातर्फे डेमो सादर करण्यात येणार आहे.
तसेच दि.२१ जुन रोजी अ.वि. बावडेकर कॉलेज शिरोडा व दि. २२ जुन रोजी होमिओपॅथिक कॉलेज वेंगुर्ला येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. असे वेंगुर्ला पोलीस ठाणेचे पोलीस निरक्षक श्री. अतुल जाधव यांनी सांगित
ले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.