आजरा लाटगांव प्राथमिक शाळेत शिक्षक देण्याची पालकांची मागणी. अन्यथा पंचायत समिती समोर दि.२५ रोजी शाळा बंद निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील लाटगांव प्राथमिक शाळेला शिक्षक मिळणेबाबत गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना लाटगांव ग्रामस्थानी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की १५ जून २०२३ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विद्यामंदिर लाटगांव शाळेत या शैक्षणिक वर्षात ३९ मुले शिकत आहेत. परंतु शाळेत सद्या दोनच शिक्षक कार्यरत असल्याने व पहिली ते सातवी वर्गाला शिक्षक अपुरे पडत आहेत. गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चालू वर्षी शाळेला शिक्षक संख्या पुरेशी मिळणे अपेक्षित होते. परंतु शाळेत शिक्षकांची रिक्त पदे न भरल्यामुळे पटसंख्या कमी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक संख्या पुरेशी नसल्याने पालक आपली मुले शिक्षणासाठी तालुक्याला किंवा दुसऱ्या गावातील शाळेत पाठवत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाण्याचा त्रास पालकांना लागणारा खर्च व गावातील प्राथमिक शाळा टिकली पाहिजेत लाटगांव शाळेत पुरेसा शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत किंवा सहायक शिक्षक देण्यात यावे अन्यथा सोमवार दि. २६ पासून गावातील सर्व पालक पंचायत समिती कार्यालयासमोर शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सरपंच वामन सुतार, शाळा समिती अध्यक्ष धोंडीबा देसाई, तसेच रणजीत सरदेसाई, शंकर सरदेसाई, संदेश दळवी, सुधीर सुपल, दिलीप चौगुले, विलास सुतार, महादेव कांबळे, दिपाली सरदेसाई, सुनिता ठिकार, सरला शिंदे, पूजा चौगुले, सह माता पालक, ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
चौकट.
( सहाय्यक शिक्षक म्हणून मदत करणाऱ्या शिक्षकांना राजकीय विरोध कशासाठी. )
【 आजरा तालुक्यातील कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळेसह अन्य प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक कमी असल्याची तक्रारी नेहमीच शाळा समितीच्या माध्यमातून होत असतात. चालू २०२३ शैक्षणिक वर्षांमध्ये असे अनेक प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सहाय्यक शिक्षक समितीच्या विनंतीवरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत. परंतु काही गावांमध्ये प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक काम करण्यास तयार असताना गावातून राजकीय विरोध करून अशा होतकरू शिक्षक व शिक्षकांना घरी पाठवण्याचे काम राजकीय मंडळी करत असल्याचे समजते. यामध्ये राजकारण बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व अगोदरच पटसंख्या कमी असलेल्या शाळेची अधिक पटसंख्या कमी होऊ नये यासाठी राजकीय विरोध बाजूला ठेवून सदर शिक्षक शिक्षिका यांना विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या कामात राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करू नये असे प्रकार काही प्राथमिक शाळेत सुरू आहेत त्याची चौकशी करून याकडेही शिक्षण विभागाने लक्ष दिले पाहिजे. अशी मागणी देखील होत आहे. 】
