Homeकोंकण - ठाणेकल्याणमध्ये आम्ही सांगू तोच उमेदवार.- भाजपने श्रीकांत शिंदेंविरोधात दंड थोपटले.- राजकारण तापल

कल्याणमध्ये आम्ही सांगू तोच उमेदवार.- भाजपने श्रीकांत शिंदेंविरोधात दंड थोपटले.- राजकारण तापल

कल्याणमध्ये आम्ही सांगू तोच उमेदवार.- भाजपने श्रीकांत शिंदेंविरोधात दंड थोपटले.- राजकारण तापल

कल्याण :- प्रतिनिधी.

आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले असून त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमांकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पाठ फिरवत आहेत. कालच्या दिव्यातील कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदार सुपुत्राकडून भाजप कार्यकर्त्यांची कामे अडविण्याच्या, त्यांना अडचणीत आणण्याच्या, मंत्री रवींद्र चव्हाण यांना पाण्यात पाहण्याच्या सुप्त हालचालींमुळे ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. दरम्यान आजच्या बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा संताप पाहता शिवसेना-भाजप मधील दरी खूपच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.