कोल्हापुरातील आक्षेपार्ह पोस्टबाबत आजऱ्यात शांतता समिटीची बैठक. – शांतता राखण्याचे सपोनि. श्री. हरुगडे यांचे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापुरात शिवराज्याभिषेकदिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या निषेधार्थ कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला याबाबत आजरा येथे दोन्ही समाजाच्या नागरिकांना एकत्र बोलावून शांतता समितीची बैठक बोलून शांतता राखण्याचे आवाहन सपोनि. सुनिल हरुगडे यांनी केले. शांतता बैठकीला संबोधित करताना श्री हरगुडे म्हणाले आजऱ्यामध्ये आपण दोन्ही समाजाने शांतता राखूया बंद करून समाजाला व व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये यामध्ये व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजेत व शांतता अबाधित ठेवावी यासाठी अपप्रवृत्तींना पाठीशी न घालता सर्व समाजाने शांतता राखूया असा काही पोस्ट करणाऱ्यांना पोलीस कारवाई करतील परंतु आपण दोन्ही समाजातील घटकांनी एकत्र येऊन अशा घटनेचा शांततापूर्वक विचार करून शांतता राखल्यास दोन्ही समाज गुणा गोविंदाने राहतील यासाठी शांतता कायम राखली पाहिजे गुन्हेगारांना पोलीस प्रशासन कायद्याने ताब्यात घेऊन कारवाई करतील परंतु आपण आपल्या शहरांमध्ये शांतता राखूया यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सपोनि श्री हरगुडे यांनी केले यावेळी नायब तहसीलदार श्री. देसाई शांतता राखण्याबाबतचे अवाहन केले. तर भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, नाथ देसाई, युनूस सय्यद सह मुस्लिम बांधवांनी शांतता राखावी व अक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व कारवाई करावी अशी मागणी केली. या बैठकीला दिवाकर नलवडे, गौरव देशपांडे, महेश पाटील, सचिन इंदुलकर, मुकुंद निर्मळे ,अमजत माणगावकर सह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अनिल तराळ यांनी मानले.
【 ग्रामीण भागात सोशल मीडियावर अप्रवृत्तींना आळा बसण्यासाठी व सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर कोणते गुन्हे आहेत व यामुळे समाजातील लोकांना किती त्रास होतो याबाबतची “सायबर सुरक्षा फायदे व तोटे” याबाबत अभ्यासपूर्वक माहिती देणारे सायबर कॅम्पने गावोगावी माहिती द्यावी त्याचे आयोजन करावे अशी मागणी देखील या शांतता बैठकीत करण्यात आली. 】
