Homeकोंकण - ठाणेआजरा साखरकडे आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील स्थानिक वाहतुकदारांनी करार करणेचे चेअरमन...

आजरा साखरकडे आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील स्थानिक वाहतुकदारांनी करार करणेचे चेअरमन संचालक मंडळाचे यांचे आवाहन

आजरा साखरकडे आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील स्थानिक वाहतुकदारांनी करार करणेचे चेअरमन संचालक मंडळाचे यांचे आवाहन.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या सन. २०२३ -२४ या गळीत हंगामाकरीता ४ ते ४.५ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यानुसार कारखान्यास आवश्यक तोडणी वाहतुकीचे करार करणेचे काम सुरू असून. कारखान्याने ठेवलेल्या उदिष्टा प्रमाणे ऊस उपलब्ध व्हावा या करीता आजरा, गडहिंग्लज, चंदगड या ठिकाणातील ऊस नोंदीचे काम सुरू असून सदर ऊस गाळपाकरीता आणणेसाठी प्राधान्याने स्थानिक यंत्रणा करणेचे धोरण संचालक मंडळाने आखले आहे. त्याकरीता आजरा गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील तसेच स्थानिक तोडणी वाहतुकधारकांचे करार करणेचे काम सुरू आहे. पहिल्या दहा करार केलेल्या तोडणी वाहतुकदारांना धनादेशाचे वाटप केले आहे व उर्वरित कंत्राटदारांचे कागदपत्रांची पुर्तता पाहून धनादेश वितरीत केले जात आहेत. जास्तीत जास्त स्थानिक तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी प्राधान्याने करार करावेत. तसेच कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधुन तोडणी वाहतुकीचे करार पुर्ण करावेत असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी सागितले.
यावेळी कारखान्याच्या संचालक विष्णू केसरकर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक मधुकर देसाई, दिगंबर देसाई, श्री. सुधीर देसाई, श्री. लक्ष्मण गुडूळकर, दशरथ अमृते अनिल फडके तानाजी देसाई, कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, मुख्य शेती अधिकारी भुषण देसाई, वर्क्स मैनेंजर (टेक्नी.) श्री. वसंतराव गुजर, प्रोडक्शन मॅनेजर (प्रोसेस) संभाजी सावंत, अकौटंट श्री. रमेश वांगणेकर तसेच शेती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.