Homeकोंकण - ठाणेमोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नगरपंचायतने करावा - अन्यथा मोकाट कुत्री नगरपंचायत च्या टेबलला...

मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नगरपंचायतने करावा – अन्यथा मोकाट कुत्री नगरपंचायत च्या टेबलला बांधू आजरा शिवसेनेचा इशारा.

मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नगरपंचायतने करावा – अन्यथा मोकाट कुत्री नगरपंचायत च्या टेबलला बांधू आजरा शिवसेनेचा इशारा.

आजरा. – प्रतिनिधी.

मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नगरपंचायतने करावा याबाबत निवेदनाने आजरा शिवसेनेचे शहर प्रमुख ओंकार माद्याळकर सह शिवसैनिकांनी नगरसेवक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायत यांना निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आजरा शहरामध्ये भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे. रविवार दि. ४ रोजी सायंकाळी आजरा शहरांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांना चावून गंभीर जखमी केलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासाठी अशा कुत्र्यांचा वावर वाढलेले जिवितास धोका निर्माण होवू शकतो. यास सर्वन नगरपंचायत जबाबदार असाल
तरी आपल्याकडून पिसाळलेल्या कुत्र्यांचा आजरा नगरपंचायतने बंदोवस्त ताबडतोब करावा असे न झाल्यास शहरात मोकाट फिरणारे कुत्र्यांना नगरपंचायतच्या टेबलला बांधव्यात येईल यांची खबरदारी घेवून ताबडतोब कुत्र्यांचा बंदोबस्त अन्यथा नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, महेश पाटील युवासेना शहर प्र युवसेना उपजिल्हा प्रमुख शिवसेना शहर रोहन गिरी सह शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.