बेकायदेशीर एकजमाव करत एस.टी केबीनचा दरवाजा उघडुन आत प्रवेश करुन लाथाबुक्यानी मारहान प्रकरणी.- आजरा पोलिसात ७ जनावर गुन्हा दाखल.
आजरा. – प्रतिनिधी.
बेकायदेशीर एकजमाव करून एस.टी केबीन चा दरवाजा उघडुन आत प्रवेश करुन लाथाबुक्यानी मारहान केली असल्याची फिर्यादी
रविंद्र रामचंद्र मगदुम वय ३७ व्यवसाय नोकरी रा पिंपळगाव ता यांनी दिली आहे. दिलेल्या फिर्यादीतील हकीकत अशी कि
गडहिंग्लज कडुन आजरा कडे एस.टी बस नं एम.एच. ०६५८२२४ यामध्ये प्रवासी घेवुन येत असताना सोहाळे फाटा येथे आलो असता समोर येणा-या इनोव्हा गाडी एम.एच. ४६ ए.पी. २७३७ वरील चालकाने मी चालवत असले एस.टी बसचे पाठीमागे इनोव्हा गाडी भरधाव वेगाने येवून घासली यांचा मनात राग धरून मी सरकारी काम करीत असताना यातील आरोपीत नं ०१ ते ०७ यानी बेकायदेशीर एकजमाव करून एस.टी केबीन चा दरवाजा उघडुन त्यामध्ये चढून आत प्रवेश करुन मला लाथाबुक्यानी मारहान केली व प्रवाशी दरवाजातून काही लोक एस.टी मधे प्रवेश करून वाहक कौस्तुभ आनंदा चौगुले हा मला सोडवण्यासाठी आला असता त्यालाही लाथाबुक्यानीमारहान केली त्यावेळी त्याचे खिश्यातील २३००/- रुपये कोठे तरी पडले तरी वरील लोकाचे विरुद्ध कायदेशीर तक्रार फिर्यादी याने दिली आहे. दिलेल्या जबाबावरून सदरचा गुन्हा दाखल करणेत आला आहे. या गुण्यातील
आरोपीचे रोशन बाळाराम राऊत, अजिक्य विजय भिकोट, प्रविण जनार्दन गिध, अजित अनंत भोईर, राहुल बाळाराम राऊत, किशोर विठ्ठल भोईर, मिलिंद लक्ष्मण पांगत सर्व रा मोहपाडा रसायनी ता खालापुर जि रायगडचे असून सोहाळे ता.आजरा. जि.कोल्हापूर फाटा गावचे हद्दीत गुन्हा दाखल ता.य दि. ५ रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यातील वाहने – एस.टी बस, इनोव्हा गाडी आहे. तर
गुन्ह्यातील जखमी फिर्यादी स्वःत आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास मा. सपोनि सो यांचे आदेशाने पो.ना ४२० घाटगे हे करीत आहेत.
