जातीव्यवस्थेचा खातमा केल्याशिवाय कष्टकरी जनता शांत बसणार नाही. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई.
( अक्षय भालेरावचा खून हा जातीव्यवस्थेचा बळी.)
आजरा. – प्रतिनिधी.

अक्षय भालेरावचा खून हा जातीव्यवस्थेचा बळी असून जातीयवादाला गाडल्याशिवाय कष्टकरी जनतेची मुक्ती नाही. जातीव्यवस्थेचा खातमा केल्याशिवाय कष्टकरी जनता शांत बसणार नाही. असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी दिला. आज आजरा येथे श्रमिक मुक्ती दल आणि सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने बोनढार जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव याच्या खुनाच्या निषेधार्थ आणि सावित्रीबाई फुले यांची इडिंक टेल्सने केलेली बदनामी व लैंगिक गैरवर्तन केलेल्या ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी यासाठी निघालेल्या मोर्च्या सामोरं बोलतांना त्यांनी दिला. कॉ श्री. देसाई बोलताना पुढे म्हणाले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आपणा सर्वाना लढण्याचे अधिकार दिले. शेताकऱ्यांना, स्त्रियांना, दलित,भटके विमुक्त आदिवासीना आज जे लढण्याचे अधिकार मिळाले ते केवळ सांविधानामुळे. त्याचं संविधान कर्त्याची जयंती साजरी केली म्हणून या देशात एका दलित तरुणांचा खून होत असेल तर आपणा सर्वाना लाज वाटली पाहिजे. म्हणूनच दलितेतर समूहाने या घटनेच्या विरोधात सर्वात पुढे आले पाहिजे. बाबासाहेब आमचे आहेत, आमच्या मुक्तीची भूमिका घेऊन ते आयुष्यभर संघर्षाशील राहिले. बाबासाहेबाना अभिप्रेत असलेला समतेवर आधारलेला समाज आपल्याला आणायचा असेल तर आपल्यात भेद निर्माण करणारी जातीव्यवस्था आदी संपवली पाहिजे. सावित्रीबाई फुलेंची बदनामी करण्याचे धाडस कुठून आले आहे. एक खासदार लैंगिक गैरवर्तन करून खुलेआम फिरतो हे का होतं आहे. याचे कारण त्यांना जातीयवादी धर्मांध सरकार पाठीशी घालत आहे. अशा धर्मांध शक्तीचा बिमोड करण्यासाठी सगळे एकत्र येऊया.
सर्व श्रमिक संघटनेचे कॉ शांताराम पाटील म्हणाले कि या देशातील कामगार कष्टकरी दलित यांना न्याय आज मिळतं नाही त्यासाठी लढल्याशिवाय पर्याय नाही. यावेळी
डॉ नवनाथ शिंदे म्हणाले कि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली. त्यासाठीच आता आपल्यला अधिक संघर्ष करावा लागणार आहे. आपण सगळे मिळून तो पुढे नेऊ.
त्यानंतर तहसीलदार आजरा यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी कारण्यात आली. यावेळी धरणग्रस्त, डंगे धनगर, अपंग विधवा, परित्यक्त्या आणि कष्टकरी स्त्री पुरुष मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले होते. मोर्चाची सुरवात बाजार मैदान येथून शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सरकारच्या आणि अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देतं मोर्चा तहसील कार्यलयावर आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात प्रकाश मोरूस्कर, युवराज जाधव, संजय घाटगे, दशरथ घुरे, अशोक मालव, मुकुंद नार्वेकर, निवृत्ती फगरे, संतोष सुतार, नारायण भडांगे, काशिनाथ मोरे, रामू कोकरे, धोंडिबा झोरे भीमराव माधव, शिवाजी सावंत, बाळू जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. संजय घाटगे यांनी आभार मानले.
