Homeकोंकण - ठाणेदुध उत्पादकाच्या हिताचा कारभार करणार.- गोकुळ अध्यक्ष अरूण डोंगळे (आजरा येथे विविध...

दुध उत्पादकाच्या हिताचा कारभार करणार.- गोकुळ अध्यक्ष अरूण डोंगळे (आजरा येथे विविध संस्थामार्फत सत्कार.)

दुध उत्पादकाच्या हिताचा कारभार करणार.- गोकुळ अध्यक्ष अरूण डोंगळे (आजरा येथे विविध संस्थामार्फत सत्कार.)

आजरा.- प्रतिनिधी.

मागील तीस वर्षांहून अधिक काळ गोकुळ दुध संघात संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व दुध उत्पादकांच्या समस्यांची चांगली जाणीव आहे. गोकुळ दुध संघाचे दुसर्‍यांदा मिळालेल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्वसामान्य दुध उत्पादकाच्या हिताचा कारभार करणार असल्याचे प्रतिपादन गोकुळ दुध संघाचे नुतन अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी केले. डोंगळे यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आजरा तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. गोकुळचे अध्यक्ष  श्री.डोंगळे यांचा आजरा तालुका खरेदी-विक्री संघ, अण्णा-भाऊ संस्था समूह, आजरा महाल शिक्षण मंडळ, जनता बँक, सरपंच परिषद यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी सत्कार केले. डोंगळे पुढे म्हणाले, दुध उत्पादकांना आपला अध्यक्ष झाल्याची भावना निर्माण झाली आहे. आजरा तालुक्यातील दुधाची प्रत चांगली आहे. त्यामुळे आगामी काळात दुध वाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर दुध उत्पादनात युवकांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, अण्णा-भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी सभापती विष्णूपंत केसरकर, उदयराज पोवार, राजू होलम, रविंद्र भाटले, अभिषेक शिंपी, विक्रमसिंह देसाई यांच्यासह तालुक्यातील दुध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.