Homeकोंकण - ठाणेआज-यात सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या इंडिक टेल्स वेबचा निषेध. - ब्रिजभूषण...

आज-यात सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या इंडिक टेल्स वेबचा निषेध. – ब्रिजभूषण यांच्यावर तातडीने कारवाई करा.

आज-यात सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या इंडिक टेल्स वेबचा निषेध. – ब्रिजभूषण यांच्यावर तातडीने कारवाई करा.

आजरा -: प्रतिनिधी.

भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबचा आज-यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. नवनाथ शिंदे होते.
अत्याचबरोबर याच्या संपादक आणि लेखकावर तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातल्या आद्य शिक्षिका असून या देशात मुलींच्या शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. आज ज्ञानाच्या क्षेत्रात सर्वच जात धर्मातील भारतीय मुली ज्या भरारी घेताहेत त्याची प्रेरणा सावित्रीमाई आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल हीन पातळीला येऊन अत्यंत खोडसाळ आणि बदनामी करणाऱ्या या लेखाच्या लेखकावर आणि इंडिकटेल्सच्या संपादकावर तातडीने गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कांही महिला कुस्तीपटूनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यातील एक खेळाडू अल्पवयीन असून तिने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाची तक्रार नोंदवली आहे. ब्रिजभूषण यांच्यावर पोस्को कायद्याखाली एफआयआर देखील नोंदवला आहे. एफआयआर नोंदवून कित्येक दिवस झाले तरी अजूनही त्यांना अटक झालेली नाही. केवळ सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने त्यांना पाठीशी घातले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संघटनानी या घटनेची दखल घेत निषेध नोंदवला आहे. जागतिक पातळीवर भारताची बदनामी होत असतांना इथले सरकार या लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत आहे. हेअत्यंत वाईट आहे. हि ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळविणे खूप कठीण आणि अवघड गोष्ट आहे. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरच ही पदके मिळवून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या खेळाडूना न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आपली पदके गंगार्पण करण्याचा घेतलेला निर्णय कोणत्याही भारतीयाची मान लाजेने खाली झुकावी असाच आहे. शासनाने याबाबत ब्रिजभूषण यांच्याबाबत तातडीने कारवाई न केल्यास जनता या खेळाडूंच्या बाजूने रस्त्यावर उतरेल, सोमवरी आजरा तहसील कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय आजच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीला कॉ. संपत देसाई, प्रा राजा शिरगुप्पे, कॉ. शांताराम पाटील, प्रकाश मोरूस्कर, युवराज जाधव, संजय घाटगे, दशरथ घुरे, मुकुंद नार्वेकर, संतोष सुतार, नारायण भडांगे, भीमराव माधव, काशिनाथ मोरे, सरिता कांबळे, निवृत्ती मिसाळे, जानाबा धडाम, अशोक मालव, प्रकाश शेटगे,वंदन जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.