आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसे – मिल रोलरचे पुजन संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्यात सन २०२३-२४ गळीत हंगामाकरीता ओव्हर होलींगचे काम गतीने सुरू झाले असून कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे यांचे हस्ते आज दि.२ रोजी मील रोलर पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी बोलतांना चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी येत्या सन २०२३-२४ चा गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर, २०२३ मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी ओव्हर होलींगचे कामे सुरू आहेत. कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ करीता ८५०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पुर्ण केली आहे. येत्या गळीत हंगामात ४ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे. त्यादृष्टीने मशिनरी देखभाल दुरूस्तीची कामे सुरू असुन आजरोजी मिल रोलर पुजन केले आहे. ३० सप्टेंबर २०२३ पुर्वी कारखाना ओव्हरहोलिंगची कामे पुर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे. येणा-या गळीत हंगामासाठी सक्षम ३७५ तोडणी वाहतुक यंत्रणा करणेचे कारखान्याचे नियोजन असुन लवकरच करार झालेल्या यंत्रणेला अॅडव्हान्स वाटप सुरू करणार आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापना मार्फत केली जात आहे अशी माहिती दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन आनंदा कुलकर्णी, कारखान्याचे संचालक विष्णु केसरकर, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संचालक मधुकर कृष्णा ” देसाई, दिगंबर यशवंतराव देसाई, उदयसिंह उर्फ मुकुंदराव बळीराम देसाई, दशरथ आनंदा अमृते, जनार्दन टोपले, मलिककुमार बुरूड, राजेंद्र नारायण सावंत, अनिल भिमा फडके आनंदा सखाराम कांबळे, तानाजी देसाई, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले, व्ही. एच. गुजर जनरल मॅनेंजर (टेक्नि ) व्ही. के. ज्योती सेक्रेटरी, शंकर आजगेकर सिव्हील इंजिनिअर, श्री. सुभाष भादवणकर, इन, लेबर ऑफीसर, कामगार युनियन अध्यक्ष श्री. प्रकाश देसाई व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

