श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी नोकरीच्या नावावर महिलेकडून घेतले १० लाख रुपये. – उपोषणकर्त्या महिलेचा संस्थेच्या गेटवर बेमुदत ठिय्या..
अमरावती :- प्रतिनिधी.
बुलढाणा जिल्ह्यातील मौजे चांगेफळ येथिल अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील निता निलेश तेल्हारकर (भांबेरे) या महिलेकडुन १० लाख रुपये घेऊन संस्थने फसवणुक केली आहे. सन २०१३ मधे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके,उपाध्यक्ष महादेव भुईभार व संस्थेचे सचिव वी गो भांबुरकर यांनी संस्थेमधे नोकरी लावून देण्याच्या नावावर १० लाख रुपये घेऊन अजूनही नोकरी दिली नसल्याने महिलेने अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या गेटवर दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण चालु केले आहे.
तत्कालीन संस्थेतील अध्यक्ष संचालक व सचिवांनी नोकरीचे आमिष देऊन महिलेला पैसे भरण्यास भाग पाडले. उपोषण कर्त्या महिलेच्या वयोवृद्ध सासरे केशवराव विश्वनाथ तेल्हारकर यांनी कुटुंबाचे उदारनिर्वाहाची दोन एकर शेती विकुन १० लाख रुपयांचा संस्थेकडे भरणा केला. नोकरीसाठी भुमिहीन झालेल्या महिलेला संस्थेमधे अजुनही नोकरी न मिळाल्याने १८ महिन्याचे लहान बाळासह उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. नोकरीच्या नावावर १० लाख रुपये हडपणारे संस्थेतील संबंधितांवर कडक कारवाई करा. या मागणीसाठी बसुन असलेल्या महिलेच्या उपोषणाला दोन दिवसांत संस्थेच्या एकाही संबंधितानी उपोषण मंडपाला भेट न दिल्याने संस्थेवर प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या संस्थेच्या अध्यक्ष व संचालकानी नोकरीच्या नावावर पैसे घेऊन अमरावती विभागातिल अनेक लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन. उपोषणकर्त्या महिलेची सर्व आपबिती जाणुन घेतली. व या उपोषणाला स्वाभिमानीचा पाठिंबा जाहीर केला. उपोषणकर्त्या महिलेची तब्येत चांगलीच खालावली आहे.या महिलेच्या मागण्या संदर्भात संस्थेने २४ तासात निर्णायक भूमिका न घेतल्यास या निर्दयी संस्थेचे पदाधिकारी व संस्थेच्या विरोधात आंदोलन पेटणार असल्याचे सुतोवाच बुलढाणा करांनी दिले आहेत.

