राज्यात यलो अलर्ट जाहीर.- मुंबई आणि कोकणात 8 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार
(राज्यात 16 जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार) – हवामान खात्याची माहिती.
( पुढील दोन दिवस काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा इशारा.)
पुणे :- प्रतिनिधी.
मे महिना संपत आला आहे .जून महिन्यापासून पावसाचे वेध सुरु होतात. यंदा देशभरात आणि राज्यात मान्सून सामान्य असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहिती जाहीर केली आहे. राज्यात 16 जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत तर मुंबई अन् कोकणात 8 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आहे.
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.पावसाने घोटी, काळुस्ते, माणिकखांब, कांचनगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार आगमन केले असून गेल्या तासभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अचानक आलेल्या या अवकळी पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
