HomeUncategorizedकै. सदाशिव जाधव तृतीय स्मृती दिनानिमित्त वृक्ष वाटप.( आठवणींना उजाळा देणारा व...

कै. सदाशिव जाधव तृतीय स्मृती दिनानिमित्त वृक्ष वाटप.( आठवणींना उजाळा देणारा व पर्यावरण जपणारा उपक्रम )

कै. सदाशिव जाधव तृतीय स्मृती दिनानिमित्त वृक्ष वाटप.( आठवणींना उजाळा देणारा व पर्यावरण जपणारा उपक्रम )

आजरा. – प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील आजरा साखरचे माजी संचालक भावेश्वरी समूहाचे मार्गदर्शक कै. सदाशिव जाधव यांच्या तृतीय स्फूर्ती दिनानिमित्त जाधव परिवार व भावेश्वरी समूहाच्या वतीने गुरुवार दि. १ रोजी भावेश्वरी समूहाचे सदस्य व ग्रामस्थ यांना वृक्ष वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. वृक्ष वाटप कार्यक्रमाचा हेतू ,उद्देश व जाधव परिवाराने जतन ठेवलेल्या वृक्ष वाटप कार्यक्रमाबद्दलची माहिती तसेच कै. सदाशिव जाधव यांच्या आठवणीचा उजाळा माजी सभापती भिकाजी गुरव यांनी प्रास्ताविकात केला. भावेश्वरी समूहाच्या संचालकाच्या वतीने व जाधव परिवाराच्या वतीने वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दीपक देसाई, शिवाजी गुरव, माजी उपसरपंच, महादेव जाधव, अंतू जाधव, पांडुरंग वझरेकर, विद्यमान उपसरपंच सुशांत गुरव, श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंग जाधव यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.