आजरा मडिलतगे श्री स्वामी समर्थ – महाराज यांचे पादुका दर्शन सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील कवळेकर परिवार यांच्या घरी शुक्रवार दि. २६ रोजी श्री स्वामी समर्थ समाधी मठ ( मुळस्थान ) अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पादुका आगमन श्री वेदमूर्ती नितीन महाराज प्रभाकर पुजारी (चोळप्पा महाराज यांचे वंशज ) दिवसभर चाललेल्या या पादुका पूजन व ब्रम्हवृंद यांच्या वेदमंत्राने संप्पन झाला. मडिलगे, खेडे तसेच आजरा तालुका परिसरातील भाविक भक्तानी श्री स्वामी समर्थ पादुका दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी सुयोग कवळेकर,अतुल कवळेकर, अनिकेत कवळेकर , प्रतीक कवळेकर मडिलगे ग्रामस्थ समस्त श्री स्वामी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

