कष्टकरी, शेतकरी, अपंग, विधवा, परित्यक्त्या, डंगे धनगर, धरणग्रस्त शेतकरी आणि महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा आजरा तहसीलवर निघणार मोर्चा..
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील कष्टकरी शेतकरी, अपंग, विधवा, परित्यक्त्या, डंगे धनगर, धरणग्रस्त शेतकरी आणि महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा आपल्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सोमवार दि. ५ जून २०२३ रोजी आपल्या कार्यालयावर मोर्चा काढणार असले बाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले. आजरा तालुक्यातील कष्टकरी शेतकरी, डंगे धनगर, अपंग, विधवा, परित्यक्त्या, धरणग्रस्त शेतकरी आणि संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत त्या त्या कार्यालयांना अनेक निवेदनेही दिली आहेत. पण अजूनही ते प्रश्न सुटलेले नाहीत. प्रशासनाच्या पातळीवर जनतेचे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नाहीत. म्हणून आम्ही खालील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोर्चाने आपल्या कार्यालयावर येत येणार असून यातील प्रमुख मागण्या
आजरा तालुक्याचा पश्चिम भाग हा जंगलव्याप्त असून जंगली प्राण्यांच्याकडून शेतपिकाचे मोठे नुकसान होत आहे. जंगली प्राण्यांच्याकडून माणसांच्यावर हल्ले झाले आहेत. कांहीना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर कांहीना कायमचे अपंगत्व आले आहे. पिकांची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याबरोबर कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला वन विभागाकडून त्याला जगता येईल इतकी किमान पेंशन मिळाली पाहिजे, तसेच डंगे धनगर समाजातील लोकांचे वन हक्काचे कांही दावे मंजूर झाले आहेत तर कांही दावे मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत त्यांना वन विभागाकडून नाहक त्रास दिला जातो तो तातडीने थांबला पाहिजे. त्याबरोबर वनविभागाकडून जंगलात चारा लागवड सुरु आहे. ती लागवड करतांना डंगे धनगरांचे घरआणि लगतचा परिसर सोडून चाऱ्याची लागवड केली पाहिजे व या विभागातील जंगली प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष कायमचा संपवण्यासाठी जंगल समृधीकरणाची मागणी गेली अनेक वर्षे आम्ही करीत आहोत. आजरा तालुक्यात जंगल समृध्दीकरणाचा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची अमलबजावणी मात्र होतांना दिसत नाही. तसेच अपंग, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार स्त्री पुरुषांना कर्नाटक आणि गोव्याच्या धर्तीवर किमान ३००० रुपये इतकी दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे. आता मिळत असलेली पेन्शनही वेळेत मिळत नाही. ती दरमहा वेळेत मिळाली पाहिजे. म्हणून सर्व शासकीय कार्यालयांत अपंग स्त्री पुरुषांचा वावर सहज आणि सुलभ व्हावा यासाठी तातडीने रंप बांधले पाहिजेत, अपंग, विधवा, परित्यक्त्या आणि कष्टकरी स्त्री पुरुषांना शासकीय आरोग्य सेवा तातडीने आणि मोफत मिळाली पाहिजे. तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे आवश्यक तो औषधसाठा असला पाहिजे. कोणत्याही रुग्णाला बाहेरून औषधे आणावी लागू नयेत. ग्रामीण रुग्णालयाबरोबर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तातडीने भरले पाहिजेत, तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी, बाजारासाठी, उपचारासाठी किंवा अन्य कामासाठी येणाऱ्या स्त्रियांना स्वच्छ आणि चांगल्या मुतारीची सोय नसल्याने खूपच अडचण होते. त्यातून आरोग्याच्या नव्या समस्या तयार होतात. त्यामुळे आजरा शहरात आजरा नगर पंचायतीच्या वतीने जागोजागी स्वच्छ आणि चांगल्या मुताऱ्या खास स्त्रियांसाठी बांधल्या पाहिजेत., संकेश्वर ते बांदा या महामार्गाचे काम वेगाने चालू आहे. पण या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या जमिनीचे संपादन अजून झालेले नाही. या जमिनींचे संपादन होऊन तातडीने त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.आजरा तालुक्यात उचंगी, आंबेओहळ, चित्री, यरांडोळ, धनगरमोळा या धरणांची कामे पूर्ण होऊन पाणी तुम्बविले आहे तर सर्फनाला धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यातील शेतकऱ्यांचे कांही प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. ज्यांना पर्यायी जमिनी मिळाल्या आहेत त्यांचे अडथळे तात्काळ दूर झाले पाहिजेत. ज्यांचे संकलन दुरुस्त करायचे आहे किंवा निर्वाह क्षेत्र जादा असल्याचे सांगून ज्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळालेला नाही त्याचा क्षेत्राची पाहणी करून त्यांना पर्यायी जमिनीसाठी पात्र करणे, काजुबियाना किमान १५० रुपये प्रती किलो दर मिळाला पाहिजे, त्यासाठी या तालुक्याचे दंडाधिकारी म्हणून आपण व्यापारी व कारखानदार संयुक्त शेतकरी प्रतिनिधीसोबत बोलावावी, गिरणी कामगारांना मुंबईमध्ये गिरण्यांच्या जागेवरच घरे मिळाली पाहिजेत, आजरा तालुका हा भात उत्पादनात अग्रेसर असल्याने भात संशोधन केंद्र आजरा तालुक्यात झाले पाहिजे आजरा तालुक्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संशाधने व वन उपज संशोधन व प्रक्रिया केंद्र आजरा तालुक्यात झाले पाहिजे. या व इतर अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही आपल्या कार्यालयावर सोमवार दि ५ जून २०२३ रोजी आपल्या कार्यालयावर असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, वैधकीय अधिकारी आजरा ग्रामीण रुग्णालय, परिक्षेत्र वनाधिकारी, संबधित सर्व धरणांचे उपविभागीय अधिकारी, महामार्गचे उपअभियंता यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयाकडून उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या जाव्यात अशी विनंती निवेदनात केली आहे या निवेदनावर कॉ संपत देसाई कार्याध्यक्ष श्रमिक मुक्ती दल, कॉ. शांताराम पाटील (सर्व श्रमिक संघटना ) प्रकाश मोरुस्कर दशरथ घुरे, युवराज जाधव नारायण भडांगे, कृष्णा सावंत अशोक मालव, निवृत्ती फगरे मुकुंद नार्वेकर,भीमराव माधव संजय घाटगे, प्रकाश शेटगे संतोष पाटी, प्रकाश कविटकर मारुती पाटील,धोंडीबा झोरे
अशोक बांदेकर,शिवाजी येजरे काशिनाथ मोरे,बयाजी येडगे जानाबा धडाम, संतोष सुतार आदींच्या सह्या आहेत.
