आजरा तालुक्यात ३५ ऊसतोड मजूर पुरवणाऱ्यानी वाहतुकदारांची केली १ कोटी ६७ लाखाची फसवणूक.- पहा काय आहे.. 👇
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील ३५ वाहतूकदारांची विविध ऊसतोड मुकादम, मजूर पुरविणारे यांनी १ कोटी ६७ लाख ८७ हजार रूपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी (दि. १९) रोजी दिवसभरात या तक्रारी आजरा पोलिसांत करण्यात आल्या आहेत.
आजरा पोलिस स्टेशनमध्ये दिवसभरात ३५ फसवणूक झालेल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली आहे. फसवणूक करणार्या व्यक्ती बीड, वासिम, उस्मानाबाद या जिल्ह्यातील आहेत. फसवणूक झालेले वाहनधारक व टोळीवाले हे तांबाळे, संताजी घोरपडे, आजरा, गडहिंग्लज या साखर कारखान्याशी संबंधित आहेत.
तर शुक्रवार आठवडा आजरा बाजारात तीन मोबाईलवर चोरट्यांचा हात
शुक्रवार आठवडी बाजारात अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईल चोरले आहेत.यामध्ये मोटोरोला कंपनीचा ८ हजार किंमतीचा,६ हजार किंमतीचा आयटेल कंपनीचा व ८ हजारांचा रेडमी नोट कंपनी यांचा समावेश आहे.याबाबतची तक्रार आजरा पोलीसात दाखल झाली आहे.
