२२ मे पासून दुचाकीस्वाराना हेल्मेट सक्ती.- कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली माहिती.
कोल्हापूर. – प्रतिनिधी.
जिल्ह्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार दि.२२ मे पासून दुचाकीस्वाराना हेल्मेट सक्ती करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
आठ दिवस कारवाई न करता करणार जनजागृती
त्यानंतर हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वाराना १००० रुपये करणार दंड
दुचाकीस्वार ज्या संस्थेत, कार्यालयात, कंपनीत काम करतो त्या मालकासही होणार १००० रुपये दंड कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.पाटील यांनी दिली माहिती पहिल्या टप्प्यात सरकारी कार्यालय, खाजगी कार्यालय आणि कॉलेज यांचा समावेश
जिल्ह्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय असल्याचे बोलताना सांगितले.
