गडहिंग्लज.- आरटीओ लायसन्स शिबीर कायदेशीर – नियोजनबद्ध – शिबिरामध्ये सहभागी होऊनच लायसन घेऊन वाहन चालवणे योग्य. – आरटीओ निरीक्षक श्री भोसले श्री गडकर
गडहिंग्लज. – प्रतिनिधी.

आरटीओ ल लायसन्स हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.अलिकडे ऑनलाइन लर्निंग लायसन्समुळे सुटसुटीतपणा आला असला, तरी लायसन्स मिळवण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रियापार पाडाव्या लागतात. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी सदर शिबिर ( कॅम्पस ) आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी नियोजनबद्ध असे नियमाचे काटेकोरपणे पालन करत घेतले जाते शुक्रवार दि. १९ रोजी आरटीओ निरीक्षक सागर भोसले तसेच संदीप गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे शिबिर संपन्न झाले. यावेळी आरटीओ निरीक्षक यांनी आपण वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, वाहन कसे चालवावे तसेच टू व्हीलर चालवत असताना आपल्याला डोक्यावर हेल्मेट असणे गरजेचे आहे. व फोर व्हीलर चालू असताना सीट बेल्ट सह अन्य माहिती दिली व यानंतरच शिबिराला सुरुवात करण्यात आली.

या शिबिरासाठी आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील रवळनाथ, जोमकाई, पारस, औकार, तसेच श्री गणेशा मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या स्कूल मधून शिकून प्राप्त उमेदवार सदर शिबिरामध्ये आपली लायसन मिळावी यासाठी दिलेल्या प्रशिक्षणाप्रमाणे व उपस्थित आरटीओ निरीक्षक यांनी दिलेले मार्गदर्शन व माहिती या आधारे शिबिरामध्ये सहभागी झालेले उमेदवार आपल्या वाहनाची ट्रायल देतात यामध्ये यशस्वी असलेल्या विद्यार्थी यांना पात्र ठरविण्यात येते व चुकीच्या पद्धतीने वाहन चालवण्यास सदर उमेदवारास अपात्र ठरले जाते व पुन्हा पुढच्या शुक्रवारी आपल्या वाहनाची ट्रायल देण्यासाठी हजर राहावे लागते. नियोजनबद्ध व वाहन कसे चालवावे यासाठी खरोखरच लायसन्स मिळवण्यासाठी शिबिरामध्ये सहभाग घेऊन लायसन मिळवणे उपयुक्त असते हे या शिबिरामुळे लक्षात येते

ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. तिथे तारीख मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते. किंवा आपल्या जवळील मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपण ट्रेनिंग घेऊन त्या लायसन्स शिबिरामध्ये सहभागी होऊ शकता
संबंधित वाहनांचे लायसन्स असल्याखेरीज ते वाहन सार्वजनिक ठिकाणी चालविता येत नाही.
शुक्रवार रोजी झालेल्या शिबिरामध्ये आरटीओ निरीक्षक श्री भोसले, श्री गडकरी सह किरण कुलकर्णी, प्रकाश गाडवी, संजय जोशी, सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तर मोटर वाहन स्कूल चालक-मालक व कृष्णा देसाई यांचे शिबिर संपन्न होण्यासाठी सहकार्य लाभले टू व्हीलर व फोर व्हीलर लायसन्स साठी अंदाजे २५० उमेदवारांनी सहभाग घेतला होता.

