Homeकोंकण - ठाणेआजरा बहिरेवाडीच्या शेतक-याने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक:- भुईमूग पिक स्पर्धा.

आजरा बहिरेवाडीच्या शेतक-याने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक:- भुईमूग पिक स्पर्धा.

आजरा बहिरेवाडीच्या शेतक-याने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक:- भुईमूग पिक स्पर्धा.

आजरा.- प्रतिनिधी.

बहिरेवाडी (ता.आजरा) येथील कृष्णा भाऊ चौगुले यांनी भुईमूग पीक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.त्यांना पन्नास हजार रुपये रोख बक्षीस मिळणार आहे.त्यानी ६१.३३ प्रतिहेक्टरी उत्पादन घेतले.
रामचंन्द्र विठ्ठल कोरे (रा.ऐतवडे खुर्द,ता.वाळवा,जि.सांगली) यानी हेक्टरी ६०.३१ उत्पादन व सावित्रीबाई रामचंद्र पाटील (रा.ऐतवडे) यांनी ५५.७३ हेक्टरी उत्पादन घेतले.त्याना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे, तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात खरीप हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पीक स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल, मूग व उडीद या ११ पिकांचा समावेश असतो.
कृष्णा चौगुले हे गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत.त्यांनी ६ गुंठे क्षेत्रात भुईमूग पिक घेतले. यासाठी त्यांनी जी.एस. वेस्टर्न २४ या बियानाचा वापर केला.
या बियानात तेलाचे प्रमाण जास्त आहे. उत्पादन हे भरपूर येते याशिवाय भुईमुगाचे दाने चवीला चांगले लागतात या बियाणात रोग प्रतिकारशक्ती जास्त आहे .त्यामुळे या बियाणाचा वापर त्यांनी करण्याचा निर्णय घेतला. चौगुले यानी दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात विहीर खोदली होती.या विहिरीची माती त्याने शेतात पसरली या मातीचे कृषी विभागाकडून माती परीक्षण करून घेतले. भुसभुशीत व भुईमुगासाठी पाण्याचा निचरा होईल अशी माती तयार झालेने यामध्ये त्यांनी लागवड करण्याचा निर्णय घेतला .
शेणखताचा वापर व वेळोवेळी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी औषध फवारणी केली. यामुळे पिक तरारुण व चांगले आले. कृषी विभागाने त्यांच्या पिकाचे परिक्षण करुन ते पिक स्पर्धेसाठी पाठवले. तालूका कृषी अधिकारी के.एम.मोमीन, कृषी पर्यवेक्षक व्ही.आर.दळवी,कृषी सहायक शिवाजी गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

कृष्णा चौगुले हे प्रगतीशील शेतकरी आहेत.त्यांनी यापूर्वी कमी पाण्यावर उचांकी कांदा उत्पादन घेतले होते.
ते नेहमी परिसरात शेतक-याना मार्गदर्शन करतात.
शिवाजी गडकरी – कृषी सहायक.】

चौगुले यांची प्रतिक्रिया.
[बहिरेवाडी गावाजवळ नदी अथवा मोठा नाला नाही.यामुळे गावची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.यामुळे खरीप हंगामात शेतीत वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. भुईमूग पिक गेल्या पाच वर्षांपासून घेतो. २२-२३ घ्या हंगामात भुईमूग पिक घेतले.कृषी विभागाच्या माध्यमातून ते स्पर्धेसाठी पाठवले.तालुक्यात, जास्तीत जास्त जिल्ह्यात नंबर येईल असे वाटले होते. मात्र मी नियमीत दै.अॕर्गोवनचा वाचक असल्याने ९ मे घ्या अंकात माझा प्रथम क्रमांक आल्याचे समजले. आणि आमच्या चौगुले परिवारात आनंदाचे वातावरण पसरले. या यशात पत्नी कांचन चौगुले यांचा वाटा आहे.]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.