मडिलगेत माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त.- होम – हावन अभिषेक सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदारसंघातील मडिलगे तालुका आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रामदैवत भावेश्वरी देवीला होम हवन व अभिषेक घालून आलेले संकट दूर करून उदंड आयुष्य लाभावे म्हणून ग्रामदैवताला साकडे घातले. मागील अनेक दिवसापासून ईडीच्या माध्यमातून अनेक संकटे कुटुंबावर लादत आहेत. ती फक्त त्यांच्या पर्यंत मर्यादित न ठेवता कुटुंबातील सर्व सदस्यांच्यावर चौकशी करून नाहक त्रास देत आहे. या निषेधार्थ व माजी ग्रामविकास मंत्री आम. श्री मुश्रीफ यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकट दूर व्हावे यासाठी हा होम – हवन व अभिषेक घालण्यात आला. श्री. मुश्रीफ यांचे मडिलगे हे गाव दत्तक गाव असून या गावांमध्ये अनेक योजनेसह विकास कामाच्या माध्यमातून गाव समृद्ध केले आहे.
यावेळी माजी.उपसभापती श्री देसाई व माजी सरपंच श्री गुरव यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. व श्री मुश्रीफ यांना ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी माजी सभापती भिकाजी गुरव, माजी उपसभापती दिपक देसाई, माजी सरपंच के. व्हि. येसणै, माजी सरपंच शिवाजी गुरव युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आजरा ता.अध्यक्ष अनिकेत कवळेकर, सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच सुशांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य, घोरपडे साखर चे सर्व कर्मचारी सह देवस्थान समिती अध्यक्ष सदस्य विविध संस्थेचे चेअरमन पदाधिकारी महिला संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत श्री मुश्रीफ यांना उदंड आयुष्य लाभो आलेले संकट दूर करून असा होम – हवन अभिषेक सोहळा संपन्न झाला. उपस्थित सर्वांचे आभार सरपंच श्री. निऊगरे यांनी मानले. महाआरतीने कार्यक्रम संपन्न झाला.

